मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई ओस पडली आहे. त्यामुळे मुंबईत गरजू नागरिकांना शिवसैनिक अन्नदान करीत आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस समोरील आजाद मैदान लगत बसलेल्या बेघर लोकांसाठी आज सकाळी अन्नाची पाकीट वाटण्यात आली.
हेही वाचा- ''लॉकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार"
शिवराज्य सेवाभावी संस्था शिवसेना शाखा क्रमांक 225 आणि हिंदुस्थान माथाडी कामगार सेनेचे सुरेश कोळी आणि विकास मळेकर यांनी आज बेघर लोकांना अन्न वाटप केले.