ETV Bharat / state

Spanish Women Organ Donation : परदेशी महिलेचे अवयवदान; मुंबईत पाच जणांना मिळाले जीवदान

भारतात पर्यटनासाठी आलेल्या एका स्पॅनिश महिलेने आपले प्राण गमावल्यानंतर तिच्या इच्छेनुसार मुंबईत तिचे अवयवदान करण्यात आले. यामुळे पाच व्यक्तींना जीवदान मिळाले आहे. एक परदेशी महिला अशा पद्धतीने अवयवदान करत असेल तर नागरिकांनीही आता स्वयंस्फूर्तीने पुढे यायला पाहिजे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते करत आहेत.

Spanish Women Organ Donation
परदेशी महिलेचे अवयव दान
author img

By

Published : Jan 13, 2023, 7:44 PM IST

मुंबई : टेरेसा फर्नांडिस नावाची एक स्पॅनिश महिला मुंबईत पर्यटनासाठी आली होती. मुंबई नजीकच्या एलिफंटा गुफामध्ये पर्यटनाला जात असताना अचानक बसमध्येच ही महिला 5 जानेवारीला कोसळली. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने या महिलेला खूप त्रास झाला. यादरम्यान महिलेला जसलोक रुग्णालयात दाखल करत तिच्यावर ताबडतोब उपचार सुरू करण्यात आले. अतिशय उच्च रक्तदाब असल्याने महिलेच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. हे रक्त मेंदूत पसरल्यामुळे शस्त्रक्रिया करणे अवघड होऊन बसले होते. अशातच महिलेचा रक्तदाब कमी होत नसल्याने शस्त्रक्रिया करणे अवघड गेले. मात्र तरीही महिला वाचू शकली नाही, अशी माहिती रुग्णालयातील न्यूरो सर्जन डॉ. आजाद इराणी यांनी दिली. ब्रेन डेड झाल्याने डॉक्टरांना पुढे काहीच करता आले नाही.

महिलेच्या इच्छेनुसार अवयव दान : महिलेला मृत घोषित करण्यात आल्यानंतर या स्पॅनिश महिलेची मुलगी सात तारखेला भारतात पोहोचली होती. या मुलीने आईच्या इच्छेनुसार तिचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कुटुंबाच्या परवानगीने या महिलेच्या शरीरातील हृदय चेन्नई मधील एका रुग्णाला देण्यात आले. फुफ्फुस दुसऱ्या रुग्णाला देण्यात आले. यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड एका स्थानिक रुग्णाला देण्यात आले. त्यामुळे या सर्वांचा जीव वाचला.

पाच रुग्णांना मदत : टेरेसा फर्नांडिस यांच्या अवयवदानामुळे पाच रुग्ण त्रासापासून मुक्त झाले आहेत. टेरेसा फर्नांडिस यांच्यामागे मुलगी आणि मुलगा असे कुटुंब आहे. त्या एका रुग्णालयातून फार्मसी आणि मायक्रोलॉजी विभागातून नुकत्याच निवृत्त झाल्या होत्या. निवृत्तीनंतर त्यांनी आइसलँड आणि साऊथ कोरिया या देशांचाही दौरा केला होता, अशी माहिती त्यांची कन्या पिरेज यांनी दिली. पिरीज यांनी आपल्या आईच्या अस्थी शुक्रवारी स्मशानभूमीतून ताब्यात घेतल्या.

अवयवदानासाठी पुढे येण्याचे आवाहन : एका परदेशी महिलेने भारतात मृत्यू झाल्यानंतरही अवयवादानाच्या आपल्या इच्छेनुसार अवयव दान केल्यामुळे पाच रुग्णांच्या मदतीसाठी त्यांचे मोठे योगदान झाले. याचप्रमाणे भारतीय नागरिकांनीसुद्धा पुढे येऊन अवयवदान केले पाहिजे व गरजूंना तातडीने मदत केली पाहिजे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते जॉन मिनेजीस यांनी केले आहे.

आतापर्यंतची अवयवदानाची संख्या : आतापर्यंत जानेवारीच्या गेल्या बारा दिवसांमध्ये दोन व्यक्तींनी आपले अवयवदान केले आहे. गेल्यावर्षी म्हणजे 2022 मध्ये 41 व्यक्तींनी अवयव दान केले होते. तर 2021 मध्ये 37 लोकांनी अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केली होती. 2019 मध्ये सर्वाधिक म्हणजे 76 जणांनी अवयवदान केले होते, अशी माहितीही जॉन मिनेजीस यांनी दिली.

हेही वाचा - Kinwat Trader Murder : मरावे परी कीर्ती रुपी उरावे, व्यापारी श्रीकांत यांचे अवयव दान ; मृत्युनंतर मिळाले आठ जणांना जीवदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.