मुंबई - गेल्या काही वर्षांपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा ताण सुरक्षा कर्मचाऱ्यांवरही वाढला आहे. कमी सुट्ट्या तसेच कामाची वेळ वाढल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे आपल्या आरोग्याविषयी तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार या आजारांचे प्रमाण वाढले आहे. तसेच रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनाही अनेकदा रेल्वे स्टेशनवर काही आजार झाल्याने त्यांना तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळावी, या उद्देशाने आरपीएफ कर्मच्यांऱ्याना लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आले.
आरपीएफ जवानांची आरोग्य तपाणसी -
हृदयविकाचा झटका आल्यास त्याला प्राथमिक उपचार कसे करावेत किंवा इतर प्राथमिक वैद्यकीय सेवा कशा प्रकारे देता येईल, याचे प्रशिक्षण यावेळी कर्मचाऱ्यांना देण्यात आले. दादर आरपीएफ या उपविभागातील जवळपास सव्वाशे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच आरपीएफ जवानांची आरोग्य तपाणसीही यावेळी करण्यात आली.
हेही वाचा - इंदौर पोलिसांच्या महाराष्ट्रात धाडी; आणखी तीन आरोपींना अटक