मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध निर्माते करीम मोरानी यांची मुलगी शजा मोरानी ही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिला उपचारासाठी मुंबईतील नानावटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल आहे. करीम मोरानी यांचे कुटुंबीय जुहू परिसरात राहतात. बॉलीवूड मधली बरीच मंडळी या परिसरात राहतात.
हेही वाचा- मरकजबाबत जी चर्चा सुरु आहे ती निंदनीय, मौलाना निजामुद्दीन फक्रुद्दीन यांचे मत
करीम मोरानी जुहू परिसरातील शगुन या इमारतीत राहत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मुलगी जोया व शजा राहते. करीम मोरानी यांच्या मुलीचा वैद्यकीय अहवाल रविवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्यामुळे मोराणी कुटुंबातील 9 सदस्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
दरम्यान, करीम मोरानी राहत असलेल्या शगुन इमारतीला सील करण्यात आले असून वैद्यकीय पथकाकडून इमारतीतील नागरिकांची तपासणी केली जात आहे.