मुंबई : चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये पॉर्न चित्रपट (Pornographic Film) बनवणाऱ्या टोळीचा कारनामा उघडकीस आला आहे. परदेशी वेब सिरीज बनवण्याच्या नावाखाली (under guise of web series) स्ट्रगलर स्री कलाकाराला काम देण्याच्या नावाखाली पॉर्न चित्रपटात काम करण्यास (acting in a porn film) सांगितले. यामुळे या स्त्री कलाकाराने संबंधित चार जणांविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी चारकोप पोलिसांनी महिला कलाकाराच्या तक्रारीवरून (complaint from struggling female artist) एक आरोपीला अटक केली असून इतर तीन जणांचा शोध पोलीस (latest news from Mumbai) घेत आहेत. (Mumbai crime)
बोल्ड वेबसीरीजमध्ये काम करण्यास सांगितले : चारकोप परिसरामध्ये एक महिला स्ट्रगलर चित्रपटात काम शोधत होते. दरम्यान याचवेळी तिचा संपर्क पोर्न बनवणाऱ्या टोळीशी आला. त्यांनी तिला विदेशी कंपनीसाठी बोल्ड वेब सिरीज काम करावे लागेल, अशी विचारणा केली. निर्मात्यांनी तिचा पॉर्न चित्रपट बनवून तो इंटरनेटवर अपलोड केला. ही बाब संबंधित महिलेच्या लक्षात येतात तिने या चार जणांविरोधात चारकोप पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली. तिच्या या तक्रारीवरून पोलिसांनी यातील एक आरोपीला अटक केली असून उर्वरित तिघांचा पोलीस आता शोध घेत आहेत.
हे आहेत आरोपी : परदेशी वेब सीरिज बनवण्याच्या नावाखाली स्ट्रगलर महिला कलाकाराला काम देण्याच्या नावाखाली पॉर्न चित्रपटात काम करण्यास सांगितले. यामुळे या स्त्री कलाकाराच्या तक्रारीनंतर निर्माता आणि दिग्दर्शक यास्मीन खानसह चार आरोपींविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. यास्मीन, अनिरुद्ध प्रसाद जंगडे, अमित पासवान आणि आदित्य अशी चारही आरोपींची नावे आहेत. या चौघांविरोधात आयपीसी आणि आयटी ऍक्टच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारकोप पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली असून इतर तीन जणांचा शोध सुरु आहे. यातील आरोपी यास्मिन खानला दीड वर्षापूर्वी मुंबई पोलिसांनी अशाच प्रकरणात अटक केली होती.
बोल्ड सीन करण्याची घातली अट : चारकोप परिसरामध्ये एक महिला स्ट्रगलर चित्रपटात काम शोधत होती. यादरम्यान तिची ओळख राहुल ठाकूर नावाच्या व्यक्तीशी झाली. या व्यक्तीने सिनेमात काम करण्यासाठी केशव नावाच्या व्यक्तीसोबत संपर्क करण्यास सांगितले. केशवने तिच्याकडे बायोडेटा आणि फोटो मागितले. त्यानंतर केशवने राहुल पांड्ये नावाच्या व्यक्तीशी संपर्क करण्यास त्या महिलेला सांगितलं. तिने राहुल पांड्येशी संपर्क केल्यानंतर त्याने सांगितलं की, वेब सीरिजमध्ये काम करावं लागेल आणि त्यात बोल्ड सीन देखील असतात. भारतात ही वेब सीरिज रिलीज होणार असल्याने महिला कलाकाराने यास नकार दिला.
मॉडेलला फ्लॅटवर नेले : ऑक्टोबर महिन्यात राहुल ठाकूरने या महिलेशी पुन्हा संपर्क केला. मोबाईल एपसाठी वेब सीरिज बनवत असून ती परदेशात प्रदर्शित होणार आहे आणि त्यातही बोल्ड सीन आहेत. त्यावर या स्त्रीने काम करण्यास होकार दिला. यानंतर तिला अनिरुद्धला भेटायला सांगितलं. त्याने या महिलेला चारकोपमधील एका फ्लॅटमध्ये नेले. तिथे एक महिला मेकअप आर्टिस्ट, यास्मीन, अनिरुद्ध आणि आदित्य होते. यास्मीनने स्वत:ला कॅमेरापर्सन असल्याचे सांगितले. तर अनिरुद्ध आणि आदित्यला अभिनेते असल्याची बतावणी करण्यात आली.
चित्रीकरणासाठी कपडे काढण्यास भाग पाडले : चित्रीकरणावेळी यास्मीनने महिलेला कपडे काढण्यास सांगितले. परंतु तिने नकार दिल्याने यास्मीनने तिला १५ लाख रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या महिलेने यास्मीनच्या धमकीला घाबरून चित्रीकरण केले. यानंतर २२ ऑक्टोबरला महिलेच्या ओळखीतल्या व्यक्तीने तिला तिचा व्हिडीओ अश्लील साईटवर असल्याचे सांगितले. यानतंर महिलेने यास्मीनला व्हिडीओ काढून टाकण्यास सांगितले. यावर यास्मीन खानने २५ हजार रुपयांची मागणी केली. मात्र, नंतर तिने पीडितेचा फोन उचलणे बंद केले.
चार जणांविरुद्ध पोलिसात तक्रार: मग महिलेने या चार जणांविरोधात भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, ही घटना चारकोपला घडली असल्यामुळे हे प्रकरण चारकोप पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. पीडित महिलेच्या या तक्रारीवरुन चारकोप पोलिसांनी यातील एक आरोपीला अटक केली असून उर्वरित तिघांचा पोलीस आता शोध घेत आहेत.