ETV Bharat / state

लढाऊ कामगार संघटना 'आयटक' करतेय शंभराव्या वर्षात पदार्पण - aituc 100 year news

देशातील कामगारांची शक्ती एकजूट करण्याचे काम आयटकने केले. या युनियनने आज 100 व्या वर्षात प्रवेश केला आहे. 1920 साली स्थापन झालेल्या हा युनियनला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे. कामगार चळवळीत या आयटकचे मोठे योगदान आहे. यंदाच्या वर्षात आयटकच्या वतीने हे शताब्दी वर्ष देशभर मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणार आहे.

लढाऊ कामगार संघटना 'आयटक' करतेय शंभराव्या वर्षात पदार्पण
author img

By

Published : Nov 1, 2019, 3:24 AM IST

मुंबई - कामगार संपला असे आज म्हटले जात असले, तरी काही वर्षांपूर्वी कामगारांच्या आवाजाने भांडवली वर्ग, सत्ताधारी हादरत होते. लाल बावटा तर मुंबईच्या कामगार चळवळीचा केंद्रबिंदू होता. आज हे सांगण्याचे कारण म्हणजे 'इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस' म्हणजेच 'आयटक' या युनियनने 100 व्या वर्षात प्रवेश केला आहे. त्यानिमित्ताने देशभरातील कामगार चळवळीचा इतिहास आज ताजा होत आहे.

लढाऊ कामगार संघटना 'आयटक'

हेही वाचा - माझ्या कार्यकाळात अधिकतर भाजपचीच सत्ता; रघुरामन राजन यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना करून दिली आठवण

देशातील कामगारांची शक्ती एकजूट करण्याचे काम आयटकने केले. या युनियनने आज 100 व्या वर्षात प्रवेश केला आहे. 1920 साली स्थापन झालेल्या हा युनियनला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे. कामगार चळवळीत या आयटकचे मोठे योगदान आहे. यंदाच्या वर्षात आयटकच्या वतीने हे शताब्दी वर्ष देशभर मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणार आहे.

1920 साली मुंबईमध्ये देशभरातील कामगार संघटना एकत्र येत आ‌यटकची स्थापना केली होती. लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली आयटकचे स्थापना अधिवेशन चर्चगेट जवळच्या न्यू इंपिरियल थिएटरमध्ये भरले होते. 'कामगार संपला' ही ओरड नेहमीच होत असते. मात्र आयटकच्या संलग्न असलेल्या हजारो कामगारांसह कामगार संघटना पुनरुज्जीवीत करण्यासाठी त्यांना एकत्र आणण्यासाठी रवींद्र नाट्यमंदीर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

'सध्या देशाची परिस्थिती पाहता खासगीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कामगारांच्या संघटनांचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे कामगार चळवळ अजून बळकट करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आज देशात विविध क्षेत्रांमध्ये विविध प्रकारच्या स्वरूपामध्ये कामगार विखुरला गेला आहे. देशातील कंत्राटी, असंघटित क्षेत्रातील, योजना कर्मचारी, औद्योगिक कामगारांना एकत्र आणून एक नवीन वाटचाल करणार आहोत. वाढते खासगीकरण, वाढत्या शहरांमध्ये आक्रसत चाललेला कामगार वर्ग, गुंडाळले जाणारे कामगार कायदे या सगळ्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करण्याची वेळ आली आहे', असे भाकपचे कॉ. प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.

Intro:मुंबई । कामगार संपला असे म्हटलं जात असले, तरी काही वर्षांपूर्वी कामगारांच्या आवाजाने भांडवली वर्ग, सत्ताधारी हादरायचे. लाल बावटा तर मुंबईच्या कामगार चळवळीचा केंद्रबिंदू होता. आज हे सांगण्याचे कारण म्हणजे इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटक या युनियनने 100 व्या वर्षात प्रवेश केला आहे...त्यानिमित्ताने देशभरातील कामगार चळवळीचा इतिहास आज ताजा होत आहे...Body:देशातील कामगारांची शक्ती एकजूट करण्याचे काम ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस' युनियनने केले. या युनियनने आज 100 व्या वर्षात प्रवेश केला आहे. 1920 साली स्थापन झालेल्या हा युनियनला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे. कामगार चळवळीत या ट्रेड युनियनचे मोठे योगदान आहे. आजपासून पुढील वर्षभर आयटकच्या वतीने शताब्दी वर्ष देशभर मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणार आहे.
1920 साली मुंबईमध्ये देशभरातील कामगार संघटना एकत्र येत आ‌यटकची स्थापना केली होती. लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली आयटकचे स्थापना अधिवेशन चर्चगेट जवळच्या न्यू इंपिरियल थिएटरमध्ये भरले होते. 'कामगार संपला ओरड नेहमीच होत असते. मात्र आयटकच्या संलग्न असलेल्या हजारो कामगारांसह कामगार संघटना पुनरुज्जीवीत करण्यासाठी त्यांना एकत्र आणण्यासाठी रवींद्र नाट्यमंदीर येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या देशाची परिस्थिती पाहता खासगीकरण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कामगारांच्या संघटनांचा आवाज दाबला जात आहे. यामुळे कामगार चळवळ अजून बळकट करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. आज देशात विविध क्षेत्रांमध्ये विविध प्रकारच्या स्वरूपामध्ये कामगार विखुरला गेला आहे. देशातील कंत्राटी, असंघटित क्षेत्रातील, योजना कर्मचारी, औद्योगिक कामगारांना एकत्र आणून एक नवीन वाटचाल करणार आहोत. वाढते खासगीकरण, वाढत्या शहरांमध्ये आक्रसत चाललेला कामगार वर्ग, गुंडाळले जाणारे कामगार कायदे या सगळ्या प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करण्याची वेळ आली आहे, असे असे भाकपचे कॉ. प्रकाश रेड्डी यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.