मुंबई : राज्यात पोलिस भरतीत वारंवार तक्रारी समोर येत ( Frequent Complaints About Police Recruitment ) होत्या. राज्य शासनाने ही बाब विचारात घेत, आता अर्ज ( State Government has Now Given an Extension ) भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ ( Now Given an Extension of 15 Days For Filing Application ) दिली आहे. अशी माहिती ( Fifteen Days Extension of Police Recruitment ) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ ( Announcement by Deputy CM Devendra Fadnavis ) बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. यामुळे पोलीस भरतीतील तक्रारीदेखील दूर होण्यास मदत होणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात जवळपास वीस हजार पोलीस भरती होणार : पुढील काही दिवसांत राज्यात जवळपास वीस हजार पोलीस भरती केली जाणार असून, यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख ३० नोव्हेंबर अखेरपर्यंत आहे. दरम्यान, पोलीस भरती प्रक्रियेसाठीच्या राज्य शासनाच्या वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस भरतीबाबत निर्णय घेण्यात आला.
पोलीस भरतीसाठी आतापर्यंत ११ लाख ८० हजार अर्ज : पोलीस भरतीसाठी आतापर्यंत ११ लाख ८० हजार अर्ज आले आहेत. मात्र, काही ठिकाणांहून उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अर्ज भरण्याची मुदत आम्ही १५ दिवसांनी वाढवून दिली असून, उर्वरित तक्रारीदेखील सोडवण्यास मुदत दिली जाईल. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे. स्वातंत्र्याच्या महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची भरती प्रक्रियेला गती दिली जाईल. अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा विषयक लाभ देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.