ETV Bharat / state

कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच; सरकारची कबुली

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र थांबलेल्या नाहीत. सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीत विदर्भ-मराठवाड्यातील 312 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आता राज्य सरकारनेच जाहीर केले आहे.

mumbai
कर्जमाफी नंतरही शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच; सरकारची कबुली`
author img

By

Published : Mar 8, 2020, 6:03 PM IST

मुंबई - कर्जाच्या डोंगरामुळे शेतकरी आत्महत्या करीत असल्याने त्याला कर्जमुक्त करण्याची योजना प्रत्येक सरकार गेली अनेक वर्षे आणत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र थांबलेल्या नाहीत. सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ या कालावधीत विदर्भ-मराठवाड्यातील 312 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे आता राज्य सरकारनेच जाहीर केले आहे.

विशेष म्हणजे तत्कालीन फडणवीस सरकारनेही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना लागू केली होती. त्यानंतरही या आत्महत्या झाल्याने कर्जमाफी नेमकी कोणाला मिळते, असा प्रश्न आता पुन्हा एकदा विचारला जात आहे. मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी लेखी उत्तरात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कबुली दिली. आशिष शेलार यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि राज्य सरकार करीत असलेल्या उपाय योजनांची माहिती विचारताना विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा - 30 तासाहून अधिक वेळ राणा कपूर यांची चौकशी, समाधानकारक उत्तरे न दिल्यानं कोठडीत रवानगी

यावर उत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनी विदर्भातील अमरावती, बुलडाणा, अकोला, वाशीम, मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर ते डिसेंबर 2019 मध्ये 312 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे मान्य केले. यापैकी 134 शेतकऱ्यांची आत्महत्या प्रकरणे सरकारी मदतीस पात्र ठरवण्यात आली असून 54 प्रकरणे नियमानुसार अपात्र ठरवण्यात आली आहेत. तर, 124 प्रकरणांची चौकशी सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.