मुंबई - मुंबईमध्ये एक अशी टोळी सक्रिय झाली आहे, जी प्रसिद्ध लोकांचे फेसबुक आयडी हॅक करत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून त्यांचे जवळचे मित्र व चाहत्यांकडून पैशांची मागणी करत आहे.
फेसबुकवरून मदतीच्या नावाखाली पैशांची मागणी
कांदिवलीच्या वॉर्ड क्रमांक 31 येथील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कमलेश यादव यांनी सांगितले, की 'त्यांच्या नावावर पहिले तर एक फेसबुक अकाऊंट बनवले गेले. त्यानंतर जवळच्या मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली गेली. त्यानंतर नगरसेवकासोबत जेव्हा फेसबुक अकाऊंटवर त्यांचे मित्र जोडले गेले, तेव्हा अपघात झाल्याचे सांगितले. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कराण्याच्या बहाण्याने कमलेश यादव यांचा फोटो वापरून लोकांकडून तत्काळ मदत करण्यासाठी कोणाकडे 20 हजार तर कोणाकडे 10 हजार रुपयांची मागणी केली'.
मित्रांचे नगरसेवकाला फोन
'जेव्हा अपघाताबाबत मित्रांना कळाले, तेव्हा मित्रांनी मला फोन केला. माझी विचारपूस केली. तेव्हा मी ठीक आहे. मला काहीच झाले नाही, असे मी सांगितले', असे कमलेश यांनी म्हटले.
नगरसेवकाकडून मित्रांना सावधान
जेव्हा संपूर्ण प्रकार कमलेश यादव यांना कळाला. तेव्हा त्यांनी त्यांचे फेसबुक अकाऊंट बंद केले. शिवाय, भविष्यामध्ये असे होऊ नये यासाठी लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा - Maharashtra Rain : राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, येत्या 24 तासात मुंबई, कोकणात अतिवृष्टीचा इशारा