ETV Bharat / state

Mahaparinirvana Day : महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 अतिरिक्त रेल्वे; 12 विशेष लोकल रेल्वेची व्यवस्था - सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ( Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar ) यांच्या महापरिविर्वाण दिनानिमित्त ( Mahaparinirvana Day ) 14 अतिरिक्त रेल्वे गाड्यांची व्यावस्था करण्यात आली आहे. तसेच 12 विशेष लोकल गाड्याची व्यावस्था करण्यात येणार आहे. या संदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, ( Minister of State for Railways Raosaheb Danve ) सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले ( Minister of State for Social Justice Ramdas Athawale ) यांनी आढावा घेतला आहे.

Mahaparinirvana Day
महापरिनिर्वाण दिन
author img

By

Published : Nov 30, 2022, 10:33 PM IST

मुंबई - भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ( Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar ) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो जनता रेल्वेने प्रवास करते. त्याअनुषंगाने रेल्वेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज चर्चगेट येथील जनशिकायत कार्यालयात घेण्यात आली. ह्या बैठकीत रावसाहेब दानवे, तसेच रामदास आठवले यांनी आढावा घेतला.

महापरिनिर्वाण दिनी विशेष सोय - रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य, देशभरातून जनसमुदाय मुंबईत येत असतो. त्यांना रेल्वे स्थानकात अधिकाधिक सोयी उपलब्ध करून, त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यासाठीचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचे दानवे म्हणाले. बैठकीत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक प्रकाश बुटानी यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपापल्या विभागांतील घेण्यात आलेल्या पूर्वतयारीचे रेल्वे राज्यमंत्र्यांना सादरीकरण केले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल लाहोटी यांनी स्पष्ट केले कि, 'महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या भाविकांना पूर्व नियोजित ब्लॉकचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल तसेच नियमित सेवा चालूच राहतील.

रेल्वेतर्फे १४ अतिरिक्त विशेष गाड्या - महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेतर्फे १४ अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. तसेच आदिलाबाद - मुंबई ट्रेनला १ अतिरिक्त कोचही जोडण्यात येणार आहे. त्याबाबत प्रधान मुख्य परीचालन व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सविस्तर माहिती दिली. त्याशिवाय मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर तसेच हार्बर मार्गावर १२ उपनगरी विशेष गाड्या चालविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. त्याची माहिती मध्य रेल्वे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी दिली.

प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी कर्मचारी - मुंबईतील दादर तसेच अन्य स्थानकांवर एकाच वेळी होणाऱ्या गर्दीतील प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची विशेष ड्युटी देण्यात येईल अशी माहिती प्रधान मुख्य वाणिज्यिक व्यवस्थापक मनिजीत सिंह यांनी दिली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या अतिरिक्त गर्दीचे मॉनिटरींग, नियंत्रण करण्यासाठी आरपीएफने केलेल्या तयारीची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य सुरक्षा आयुक्त अमरेश कुमार यांनी बैठकीत दिली. या बैठकीत पश्चिम व मध्ये रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.