मुंबई - लोकसभा निवडणूक २०१९ च्या मतदानोत्तर चाचण्यांचे कल समोर आले आहेत. या कलानुसार महायुतीचेच सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज आहे. परंतु मतदारराजांनी मतदान केले त्याच लोकांना एक्झिट पोलविषयी काय वाटते? यावर ईटीव्ही भारतने मुंबईतील मतदारांकडून त्यांची मते जाणून घेतली.
लोकांची या एक्झिटपोल बद्दलची मते वेगवेगळी आहेत. कारण कोणाला वाटते भाजपने चांगली कामे केली आहेत. त्यामुळे त्यांच्या बाजूने मतदान होऊन, त्यांच्या बाजुनेच एक्झिट पोलमध्येही कल आला आहे. तर काहींना वाटते की, इतिहासात कधीच एक्झिट पोलचा निकाल तंतोतंत जुळला नाही. त्यामुळे या ही वर्षीचा एक्झिट पोल जुळणार नाही. एक्झिट पोलमध्ये मोठा फरक दिसून येणार आहे . त्यामुळे या वाहिन्यांच्या जाहीर झालेल्या एक्झिट पोलवर त्यांचा विश्वास नाही, येत्या २३ तारखेला जे खरे निकाल येतील, त्यावर जनता विश्वास ठेवेल, असे लोकांनी सांगितले.
देशाबरोबरच महाराष्ट्रात काय राजकीय परिस्थिती राहील याचाही अंदाज या एक्झिट पोलमधून समोर आला आहे .पण यामध्ये राज्यात महायुतीच्या जागा पूर्वीपेक्षा घटणार असल्या तरी तेच आघाडीवर असतील, असे चित्र एक्झिट पोलने स्पष्ट केले आहे. परंतु त्यावर काही लोकांचे दुमत आहे त्यांना वाटते की पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेत यावे.