ETV Bharat / state

वाढीव वीज बिल LIVE : भाजपाच्यावतीने राज्यभरात होतायेत निदर्शने

excessive-electricity-bill-agitation-by-bjp-in-all-maharashtra
भाजपाच्यावतीने आज राज्यभरात आंदोलन
author img

By

Published : Nov 23, 2020, 11:12 AM IST

Updated : Nov 23, 2020, 7:04 PM IST

18:59 November 23

अक्कलकोटमध्ये वीजबिलांची होळी

महाविकास आघाडी सरकारने लॉकडऊनमधील भरमसाठ वीज बिलाबाबत जनतेला रास्त सवलत द्यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष अक्कलकोट तालुका यांच्या वतीने सोमवारी सकाळी अक्कलकोट येथे आंदोलन करण्यात आले. महावितरण कार्यालयासमोर वीज बिलाच्या होळी करण्यात आली.  भाजपा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

17:01 November 23

भंडाऱ्यात वीज बिलांविरोधात आंदोलन; भाजपाकडून रास्ता रोको

वीज बिलांविरोधात आंदोलन;

लॉकडाऊन काळात आलेले वाढीव वीज बिल माफ करण्यात यावे, या मागणीला घेऊन भंडारा जिल्ह्यातही काही ठिकाणी भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले. 

17:01 November 23

मोहाडी-तुमसर विधानसभाचे भाजपाचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात तुमसर-रामटेक रोडवरील कांद्रीयेथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वीजबील संदर्भात ऊर्जामंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी प्रत्येकांनी वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळे भाष्य करून हे त्रिकुट सरकार असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले, अशी टीका चरण वाघमारे यांनी केली.

15:31 November 23

राज्य सरकार अपयशी ठरलेय; धुळ्यात भाजपाने केली वीजबिलांची होळी

वाढीव वीज बिलांच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने शहरात बिलांची होळी करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. हे सरकार राज्य करण्यात अपयशी ठरला असल्याचा आरोप खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी यावेळी केला.

15:30 November 23

रीडिंग न घेता मनमानी पद्धतीने महावितरण विज बिल आकारत आहे, आघाडी सरकारला आश्वासन देऊनही त्यावर मार्ग काढता आला नाही- सुभाष भामरे

15:10 November 23

बिल माफ करा....अन्यथा कोल्हापुरी हिसका, पोलीस व आंदोलनकर्त्यामध्ये शाब्दिक वाद

अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवू

कोल्हापुरात ही भाजपच्या वतीने लॉकडाऊनकाळातील वीज बिल माफ करावीत, यामागणीसाठी आज भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी अचानक रास्तारोको करून महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.   

15:09 November 23

सरकारने वीज बिल माफी करावी अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा भाजपने दिला आहे. दरम्यान यावेळी आंदोलन कर्ते व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली.

13:26 November 23

भाजपा पदाधिकाऱ्याची प्रतिक्रिया.

अमरावतीमध्येही भाजपा कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात वीजबिलाची होळी करून राज्य शासनाचा निषेध नोंदवला. भाजपाचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर यांच्या नेतृत्त्वात राजकमल चौकात वीजबिलाची होळी केली. तर काही कार्यकर्त्यांनी नेहरू मैदान येथील राजकमल चौकापर्यंत राज्य शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. 

13:23 November 23

आमदार देवयानी फरांदेची प्रतिक्रिया.

नाशिकमध्येही भाजपाकडून वाढीव वीज बिलाबाबत आंदोलन करण्यात आले. नाशिकच्या रविवार कारंजा भागात करण्यात आलेल्या आंदोलनात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यानी वाढीव वीजबिलाची होळी करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. भाजपा आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. सरकार नागरिकांची मुस्कटदाबी करत असून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपाने यावेळी केला. 

13:23 November 23

रत्नागिरीतील आंदोलनाची दृश्ये.

रत्नागिरीमध्येही भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वीजबिलासंदर्भात महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला.

12:49 November 23

लातूर भाजपाचे पदाधिकारी याबाबत प्रतिक्रिया देताना.

लातूरमध्येही भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वीजबिलासंदर्भात महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला.

12:49 November 23

आमदार सुरेश भोळे यांची प्रतिक्रिया.

जळगावातही भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वीजबिलासंदर्भात महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला.

12:26 November 23

शिर्डीतील आंदोलनाची दृश्ये.

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीतही भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वीजबिलासंदर्भात महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला.

12:26 November 23

भाजपा नेते किरीट सोमैया प्रतिक्रिया देताना.

ठाणे - भाजपा नेते किरीट सोमैया प्रतिक्रिया यांदर्भात महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. 

12:24 November 23

ठाण्यातील आंदोलनाची दृश्ये

ठाण्यातही भाजपाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वीजबिलासंदर्भात महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला.

11:48 November 23

पुण्यातही वाढीव वीज बिलाविरोधात भाजपाने महावितरण कार्यालयाबाहेर वीज बिलाची होळी करत आंदोलन केले. यावेळी 'सरकार सुस्त, महावितरण मस्त, विजेच्या बिलाने जनता त्रस्त', 'उद्धव आदित्य दोघेच रॉक, जनतेला देतात विजबिलाने शॉक' असे बॅनरबाजी करत सरकार विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच वीज बिलाची होळी करण्यात आली. 

11:23 November 23

वाढीव वीजबिल विरोधात मनसेही आक्रमक झाली आहे. आज मनसेच्यावतीने दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर वाढीव वीज बिल संदर्भात सर्व सामान्य जनतेकडून पोस्टकार्ड वर पत्र घेऊन मुख्यमंत्र्यांना पाठवले जाणार आहेत. तर 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलन केले जाणार आहे.

11:14 November 23

ठाण्यातील आंदोलनाची दृश्ये.

अतुल भातखळकरांसह, पदाधिकारी, कार्यकर्ते कांदिवली पोलिसांच्या ताब्यात  

11:14 November 23

ठाकरे सरकार हाय हाय, उद्धव सरकार चोर अशा भाजपा कार्यकर्त्यांकडून घोषणा

11:11 November 23

मुंबईत अतुल भातखळकरांच्या नेतृत्वात आंदोलन; वाहतूक कोंडीमुळे पोलीस-आंदोलक आमनेसामने

11:06 November 23

मुंबईत अतुल भातखळकरांच्या नेतृत्वात आंदोलन

08:07 November 23

मुंबई - महावितरणने लॉकडाऊन काळात पाठवलेली चुकीची बिले माफ करण्यास नकार दिल्याने, भारतीय जनता पार्टीतर्फे आज (सोमवारी) महाआघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.

Last Updated : Nov 23, 2020, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.