ETV Bharat / state

हिंगणाचे माजी भाजप आमदार विजय घोटमारे राष्ट्रवादीत; शरद पवार यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

नागपूर जिल्ह्यातील भाजपचे हिंगणा मतदारसंघातील माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

हिंगणाचे माजी भाजप आमदार विजय घोटमारे राष्ट्रवादीत
author img

By

Published : Sep 14, 2019, 2:21 PM IST

मुंबई - लोकसभेनंतर आता विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अनेक दिग्गज नेते सेना-भाजपामध्ये जात असतानाच आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाजपमधून इनकमिंगला सुरुवात झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील भाजपचे हिंगणा मतदारसंघातील माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

हिंगणाचे माजी भाजप आमदार विजय घोटमारे राष्ट्रवादीत

हेही वाचा - 'मोदी-शहा अखंड हिंदुस्थान निर्माण करतील, पण लोकांच्या चुली विझत गेल्या तर करायचं काय'

एकीकडे भाजप-शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रवेश करुन घेत आहेत. असे असतानाच आज (शनिवारी) भाजपलाच राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठिकाणी जोरदार धक्का देत एक माजी आमदार आपल्याकडे वळवून घेण्यात यश मिळवले आहे. भाजपमधून अनेक नाराज नेते, आमदारही राष्ट्रवादीत लवकरच प्रवेश घेणार आहेत. आणि त्याला माझ्यापासून सुरुवात झाली असल्याचे घोटमारे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - 'मला त्रास दिल्यावर काय परिणाम होतात दिसलंच असेल'

यावेळी माजी मंत्री रमेश बंब, नागपूर ग्रामीणचे कार्याध्यक्ष राजू राऊत, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे उपस्थित होते.

Intro:हिंगणाचे माजी भाजप आमदार विजय घोटमारे राष्ट्रवादीत; शरद पवार यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

mh-mum-01-ncp-vijayghotmare-ncpjoin-7201153

मुंबई, ता. १४:

लोकसभेनंतर आता विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस्मधून अनेक दिग्गज नेते सेना - भाजपामध्ये जात असतानाच आज राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये भाजपमधून इन कमिंग ला सुरुवात झाली आहे.भाजपाचे हिंगणा मतदारसंघातील माजी आमदार विजय घोटमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
एकीकडे भाजप - शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रवेश करुन घेत असतानाच आज भाजपलाच राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठिकाणी जोरदार धक्का देत एक माजी आमदार आपल्याकडे वळवून घेण्यात यश मिळवले आहे. भाजपमधून अनेक नाराज नेते, आमदारही राष्ट्रवादीत लवकरच प्रवेश घेणार असून त्यासाठी आपली ही सुरुवात झाली असल्याचे माजी आमदार विजय घोटमारे यांनी यावेळी सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले भाजपाचे माजी आमदार विजय पांडुरंग घोटमारे यांनी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.यावेळी माजी मंत्री रमेश बंब, नागपूर ग्रामीणचे कार्याध्यक्ष राजू राऊत, प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ ताकसांडे उपस्थित होते.
Body:हिंगणाचे माजी भाजप आमदार विजय घोटमारे राष्ट्रवादीत; शरद पवार यांच्या उपस्थितीत केला प्रवेशConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.