ETV Bharat / state

आज.. आत्ता... मंगळवारी संध्याकाळी 7 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर... - आज.. आत्ता...

नरेंद्र मोदी लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिले आहे. तर येणाऱ्या विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा तर २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळेंचा पराभव करणार असल्याचे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी आणीबाणीत मी १६ वर्षाचा होतो आणि माझे मामा एनडी पाटील जेलमधे होते. आमचे सरकार असते तर माझे मामा जेलमध्ये असते का? असा सवाल करत विधानसभेत खसखस पिकवली. तर मुंबईकरांसाठी खुशखबर.. आता प्रवास होणार 'बेस्ट', बेस्टच्या तिकीट दरात कपात आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे थोड्याच वेळात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे.

आज.. आत्ता... मंगळवारी संध्याकाळी 7 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक नजर...
author img

By

Published : Jun 25, 2019, 6:59 PM IST

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला लोकसभेत "असे " दिले मोदींनी उत्तर

दिल्ली - नरेंद्र मोदी लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देत आहेत. यावेळी ते सरकारच्या आगामी पाच वर्षातील कामचे नियोजन मांडणार आहेत. अनुभवी खासदारांनी त्यांचा दृष्टीकोन मांडणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. तसेच सशक्त होण्याची संधी भारताने सोडता कामा नये, असे ते म्हणाले. वाचा सविस्तर

पुढच्या लोकसभेला सुप्रिया सुळेंचा पराभव करणार - चंद्रकांत पाटील

पुणे - येणाऱ्या विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा तर २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळेंचा पराभव करणार असल्याचे वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. यासाठी दर १५ दिवसांनी बारामतीला जाणार आणि या लोकसभा मतदारसंघातील कमकुवत दुव्यावर काम करणार असल्याचेही पाटील म्हणाले. 'आपकी बार 220 पार' हाच नारा या विधानसभेला असल्याचे पाटील म्हणाले. वाचा सविस्तर

..तर माझे मामा जेलमध्ये असते का? अजित पवार यांचे प्रत्युत्तर

मुंबई - आणीबाणीत शिवसेनेने कॉंग्रेसला मदत केली, अजित पवारांच्या सरकारनचे माझ्या वडीलांना जेलमधे टाकले होते, असा आरोप आमदार बदामराव पंडित यांनी विधानसभेत केले होते. त्यांना प्रत्युत्तर देत राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी आणीबाणीत मी १६ वर्षाचा होतो आणि माझे मामा एनडी पाटील जेलमधे होते. आमचे सरकार असते तर माझे मामा जेलमध्ये असते का? असा सवाल करत विधानसभेत खसखस पिकवली. वाचा सविस्तर

मुंबईकरांसाठी खुशखबर.. आता प्रवास होणार 'बेस्ट', बेस्टच्या तिकीट दरात कपात

मुंबई - मुंबईतील बेस्ट च्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. बेस्ट समितीच्या बैठकीत बेस्टच्या दर कपातीच्या प्रस्तावाचा निर्णय अखेर बहुमताने मंजूर करण्यात आला. यामुळे मुंबईकरांचा बस प्रवास आता अधिकच बेस्ट होणार आहे. वाचा सविस्तर

ज्ञानेश्वर माऊलींना सलामी देण्यासाठी मानाच्या २२ दिंड्या सज्ज

पुणे - संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे थोड्याच वेळात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. इंद्रायणीकाठी वारकऱ्यांचा जनसागर लोटला आहे. मंदिराच्या बाजूने मानाच्या २२ दिंड्यांची जुगलबंदी सुरू आहे. यामध्ये टाळ मृदुंगाच्या नादात वारकरी बेभान होऊन, नाचत आहेत. वाचा सविस्तर

Intro:Body:
MH_Mum_CM_WaterBill_7204684

पाणीबिलं भरली नाहीत....अधिकारी झोपा काढताहेत का? अजित पवार विधानसभेत भडकले

सिलेक्टीव्ह माहीतीचा अधिकार आणि सिलेक्टीव्ह पध्दतीच्या बातम्या: मुख्यमंत्री

मुंबई: मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासहीत अनेक मंत्र्यांची नावं बीएमसीने पाणीपट्टी भरली नसल्याने डिफॉल्टर यादीत टाकली आहेत. यांचं पाणी तोडून टाका… बिना आंघोळीचं त्यांना विधानभवनात येऊ दे. त्याशिवाय यांना कळणार नाही.
पाणीबिलं भरली नाहीत....अधिकारी झोपा काढताहेत का?
अशा शब्दांत राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारचे वाभाडे काढले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा बंगला मुंबई महापालिकेने डिफॉल्टर यादीत टाकला आहे. कारण या बंगल्याचं साडेसात लाखांचं पाणी बिल थकलं आहे. फक्त मुख्यमंत्रीच नाही तर इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांची ८ कोटी रूपयांची पाणी बिलं थकली आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेकडून पाणी बिल थकबाकीदारांची माहिती मिळवली होती. त्याद्वारे ही माहिती समोर आली.

अजित पवार यांना यावरुन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला ते म्हणाले. ‘मुंबईत करोडो लोक राहतात. त्यांनी जरा कुठे पाणीपट्टी भरली नाही तर त्यांचे कनेक्शन कापले जाते. ताबडतोब त्यांना पैसे भरावे लागतात. त्यांना वाली कुणी नाही. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासहीत अनेक मंत्र्यांच्या बंगल्यावरील मीटरचे पैसे भरले जात नाही. राज्यसरकारची दयनीय अवस्था झाली आहे का? पैसे वेळेवर भरले का जात नाही ? मंत्र्यांच्या बंगल्याची पाणीपट्टी थकली का जाते?

मुख्यमंत्री म्हणाले,अलिकडच्या काळात सिलेक्टीव्ह माहीतीच्या अधिकारात माहीती घेऊन सिलेक्टीव्ह पध्दतीनं बातम्या दिल्या जात्यात. पाणी बिलं दुबार आली होती. ती दुरुस्त करुन भरण्यात आली होती. आम्हाला रोज अंघोळ करु द्या. बिनाअंघोळीचे आम्ही सभागृहात येणार नाही.

मंत्र्यांच्या याचिकेवर पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत बोलताना सहा मंत्र्यांना नोटीस दिली आहे. महाधिवक्त्यांना सभागृहात हजर करा. घटनात्मक तरतूदीमुळं राजीनामा दिलेल्या आमदाराला पुन्हा निवडून येईपर्यंत त्याच टर्म मधे मंत्री होता येत नाही.निर्णय लागेपर्यंत मंत्र्यांना काम करु देता कामा नये अशी मागणी केली होती.
मुख्यमंत्री म्हणाले,याचिका दाखल करताच वादींना नियमाप्रमाणे नोटिस दिली आहे. नोटीसीचे उत्तर आम्ही न्यायालयाला देऊ. महाधिवक्त्यांना बोलावण्याची गरज नाही. मंत्र्यांना काम करण्यावाचून वंचित ठेवता येणार नाही.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.