ETV Bharat / state

आज...आत्ता... सायंकाळी ७ पर्यंतच्या महत्वाच्या घडामोडींवर एक नजर...

author img

By

Published : May 24, 2019, 7:02 PM IST

गुजरातच्या सुरत येथे सरथाना परिसरात आग लागून १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अकलूजचा एव्हरेस्टवीर निहाल बागवानचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. याशिवाय स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेला नव संजिवनी मिळाली आहे, तर या निवडणुकीत तब्बल १७ राज्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. एवढेच नाहीतर महाराष्ट्रात फक्त बाळू धानोरकर हे एकमेव काँग्रेसचे नवखासदार ठरले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी

सुरतमध्ये आगीचा थरार...१५ जणांचा होरपळून मृत्यू, नागरिकांनी दुसऱ्या मजल्यावरून मारल्या उड्या
सुरत - गुजरातच्या सुरत शहरातील सरथाना परिसरात एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगिची तिव्रता प्रचंड आहे. इमरतीतून बाहेर पडण्याची व्यवस्था नसल्याने काहींनी थेट इमरातीच्या दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या आहे. वाचा सविस्तर...

धक्कादायक; अकलूजचा एव्हरेस्टवीर निहाल बागवानचा ऑक्सिजन अभावी मृत्यू

सोलापूर - अकलूजच्या निहाल बागवान या विराचा एव्हरेस्टची चढाई मोहीम फत्ते करून परतल्यावर ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निहालसोबत आणखी ३ गिर्यारोहक होते. त्यांचादेखील ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी सांयकाळी घडली आहे. वाचा सविस्तर...

स्वबळाची भाषा करणाऱ्या शिवसेनेला 'त्या' पलटीने तारले

मुंबई - १७ व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. जनतेने पुन्हा एकदा राज्यासह देशात भाजपला कौल दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. राज्यात युती, आघाडीच्या निकालाची आकडेवारी ही २०१४ च्या निकालापेक्षा वेगळी नाही. मात्र, या संपूर्ण लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी पाहिल्यास सत्तेला लाथ मारून युती आणि सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देणाऱ्या शिवसेनेला नव संजिवनी मिळाली आहे, हेच या निकालातून स्पष्ट होते. वाचा सविस्तर...

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस १७ राज्यातून हद्दपार तर, 'या' राज्यांत एकुलता 'एक'

नवी दिल्ली - देशातील १७ व्या लोकसभेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये सर्वात मोठा आणि जुना पक्ष असलेल्या काँग्रेसचा दारुण पराभव झालेला पाहायला मिळाला आहे. तर, या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभुतपूर्व यश मिळाले आहे. या निवडणुकीत देशातील १७ राज्यांतून काँग्रेस हद्दपार झाली आहे. देशात २९ पैकी ९ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशात काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. वाचा सविस्तर...

काँग्रेसचे एकमेव खासदार धानोरकर ठरले 'जायंट किलर'; यांनाच नाकारले होते पक्षाने तिकीट

चंद्रपूर - लोकसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी स्पष्ट झाले. यामध्ये राज्यात सेना-भाजप युतीला मागच्यावेळ सारखेच यश मिळाले. राष्ट्रवादीनेही काही महत्वाच्या जागांवर पराभव स्वीकारला. मात्र, २०१४ चा आकडा कायम राखण्यात त्यांनी यश मिळवले. काँग्रेसला मात्र, एका जागेवर समाधान मानत मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. चंद्रपूर मतदारसंघात केंद्रीय राज्य मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करत काँग्रेसचे बाळू धानोरकर हे जायंट किलर ठरले. वाचा सविस्तर...

बातमी, सर्वांच्या आधी...
https://www.etvbharat.com/marathi/maharashtra

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.