फ्रान्स : भारतीय हवाई दलाच्या राफेल प्रकल्पाचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली - फ्रान्समधील भारतीय राफेल विमानाचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. हे कृत्य कुणी केले याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही. हा प्रकार रविवारी रात्री झाला. यातून भारतासंबंधी महत्त्वाची माहिती चोरी करण्याचा प्रयत्न होता. वाचा सविस्तर...
हावडा-मुबंई गाडीच्या कोचला बडनेरा रेल्वे स्थानकावर आग
अमरावती - आज बडनेरा रेल्वे स्थानकावर साडेबाराच्या सुमारास हावडा-मुंबई या रेल्वे गाडीला ब्रेक बाइंडिगमुळे एस ११ या कोचच्या खालील बाजूस आग लागली. ही घटना फलाटावर कार्यरत असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली, त्यांनी याची माहिती ताबडतोब आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. लगेचच या आगीवर फोमचा मारा करीत ही आग विझविण्यात आली. वाचा सविस्तर...
देशात त्रिशंकू स्थिती असेल, राष्ट्रवादी पंतप्रधापदावर दावा करणार नाही - नवाब मलिक
मुंबई - देशात रालोआचे सरकार येणार नाही, एकूणच त्रिशंकू परिस्थिती राहील. आम्हाला स्थापनेपासून पहिल्यांदाच राज्यातील सर्वाधिक जागा यावेळी मिळणार असल्याने देशाच्या राजकारणात आमच्या पक्षाचीही महत्त्वाची भूमिका असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला. मतदानोत्तर चाचणीनंतर माध्यमात जे चित्र रंगवले जात आहे, तशी परिस्थिती वास्तवात नाही, निकाल उद्या स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले. वाचा सविस्तर...
पुढील २४ तास खूप महत्त्वाचे, सतर्क रहा - राहुल गांधी
नवी दिल्ली - १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी उद्या होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुढचे २४ तास महत्त्वाचे असून मतमोजणी दरम्यान घडणाऱ्या घटनांकडे लक्ष द्या, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर...
ब्राझिलियन युवतीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक
मुंबई - शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखला जाणाऱ्या कफ परेडच्या रहिवासी संघाच्या सेक्रेटरी पदावर असणाऱ्या पद्माकर नांदेकर (वय ५२) याला एका १९ वर्षीय ब्राझिलियन तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...