शिवसेना-भाजप ही अभेद्य युती; मुख्यमंत्री पदाच्या चर्चा थांबवा, आमदारांना उध्दव ठाकरेंच्या कानपिचक्या
मुंबई - शिवसेना-भाजप युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सुरू असलेली चर्चा थांबवा, याबाबतचा निर्णय भाजप अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी घेईन, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तर शिवसेना- भाजपमधील युती ही अभेद्य आहे. त्यामुळे विधानसभेच्या तयारीला लागा, अशा कानपिचक्या उध्दव ठाकरेंनी शिवसेना-भाजप आमदारांना दिल्या. वाचा सविस्तर
आता तर्राट झालोयाSS ; तुझ्या घरात आलोयाSS, जयंत पाटलांचा विखेंना गाण्यातून 'सैराट' टोला
मुंबई - आता तर्राट झालोया, तुझ्या घरात आलोया, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना टोला लगावला. सैराट चित्रपटातील 'झालं झिंग झिंग झिंगाट' हे गाणे म्हणत त्यांनी भाजप - शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. डोक्यात गेलीया हवा, ही युतीची बाधा झाली असे म्हणत त्यांनी युतीवर टीका केली. वाचा सविस्तर
..तर अक्षय देवकरचे नाव 'शाहू'च्या पहिल्या प्रवेश यादीत असते
लातूर - शाहू महाविद्यालयाच्या प्रवेश यादीत नाव येते की नाही, या भितीने आत्महत्या केलेल्या अक्षय देवकर याचे नाव या यादीत आले असते. प्रवेश मिळविण्यासाठी अक्षयने एसइबीसीचा फॉर्म भरला नाही. म्हणजे आरक्षणाचा लाभ न घेताच त्याने हा फॉर्म भरला होता. एसईबीसी यादी ही ९३.६० टक्के लागली आहे तर अक्षय ९४.२० टक्के गुण होते. त्यामुळे पहिल्याच यादीत त्याचा नंबर लागला असता मात्र, आरक्षणाच्या लाभाचा फॉर्म भरणे त्याच्या लक्षात आले नसावे. त्यामुळे यादी प्रसिद्ध झाल्यानंतर अक्षयच्या आत्महत्येबद्दलच्या निर्णयाबद्दल अधिकच हळहळ व्यक्त होत आहे. वाचा सविस्तर
आधी दुष्काळ अनं आता पूर: पैनगंगा दुथडी भरुन वाहू लागल्याने शेतकरी सुखावला
बुलडाणा - जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दोन दिवस सलग पाऊस पडल्यामुळे शहलातील नदी-नाल्यांना पूर आला आहे. पावसामुळे कोलवड गावाजवळ असलेली पैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूच्या गावातील वाहतूक बंद झाली आहे. या ठिकाणी अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. वाचा सविस्तर
तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान, लाखो वारकरी हरिनामाच्या गजरात दंग
पुणे - अधून-मधून बरसणाऱ्या वरुण राजाच्या साक्षीने आज (सोमवार) जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. यावेळी लाखो वारकरी तुकोबा - ज्ञानोबा, विठ्ठल नामाच्या गजरात दंग झाले होते. यावेळी देहू परिसर भक्तीमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाचा सविस्तर