म्हाडाच्या २१७ घरांसाठी आज सोडत; कुणाचं नशीब फळफळणार?
मुंबई - म्हाडा प्राधिकरणातील मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील २१७ सदनिकांसाठी संगणकिय सोडत आज काढण्यात येणार आहे. आतापर्यत ६६ हजार ८४ अर्ज प्राप्त झाले आहेत. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील प्रांगणात सकाळी १० वाजता या अर्जांची सोडत काढण्यात येणार आहे. सोडतीसंदर्भातील सर्व तयारी पूर्ण झाली असून सोडती करता म्हाडा प्रशासन सज्ज झाले आहे. वाचा सविस्तर...
भरधाव ट्रकच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू, संतप्त जमावाच्या मारहाणीत ट्रक चालक ठार
सांगली - हरिपूर रोड, काळी वाट येथे शनिवारी रात्री भरधाव ट्रकने एका दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात रुचा सुशांत धेंडे (६) या चिमुरडीचा मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त जमावाकडून ट्रक चालकास बेदम मारहाण करण्यात आल्यामुळे यात त्याचाही जागीच मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर...
पक्षप्रवेश लांबणार..! आमदार अब्दुल सत्तारांच्या भाजप प्रवेशाला पक्षातून विरोध
औरंगाबाद - अब्दुल सत्तार यांना भाजप प्रवेश देण्यास सिल्लोड येथील भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचा विरोध होत आहे. सिल्लोडच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन अब्दुल सत्तार यांना भाजपात प्रवेश देऊ नये, अशी मागणी केली. इतकेच नाही तर दोन दिवसात सत्तार यांचा विरोध करण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. वाचा सविस्तर...
पुण्यात राष्ट्रीय जलतरणपटूची गळफास घेऊन आत्महत्या, क्रीडा विश्वात हळहळ
पुणे - राष्ट्रीय जलतरणपटू साहिल जोशीने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमागचे कारण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. या घटनेमुळे क्रिडा विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, घटनेच्या संभाव्य कारणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...
रयतेचे राज्य..! शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शेतकऱ्यांसाठी गोळा केला जाणार मदतनिधी
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यावर्षी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी गोळा करण्यात येणार आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यावर्षी राज्याभिषेक सोहळ्याला पहिल्यांदाच काही विदेशी राजदूतही हजेरी लावणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजेंनी दिली. वाचा सविस्तर...