मुंबई - 'ईटीव्ही भारत' आज लाँन्च करण्यात आले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, रामोजी ग्रुपचे चेअमरमन रामोजी राव,विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि प्रतिष्ठित मान्यवरांनी त्या-त्या भाषेतील पोर्टलचे लॉंच केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीमुंबईत 'ईटीव्ही भारत महाराष्ट्र'चे लाँन्चिंग केले. यावेळी तमाम मराठी जनतेच्या वतीने त्यांनी ईटीव्ही भारतला शुभेच्छा दिल्या.
'ईटीव्ही भारतला' शुभेच्छा देताना मुख्यमंत्री म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सुरूवातीच्या काळात मराठी बातम्यांमध्ये ईटीव्हीला पदार्पण करताना आम्ही बघितले होते. त्यावेळी कदाचित दूरदर्शननंतर आम्ही त्याच बातम्या पाहिल्या, ऐकल्या. त्याच ईटीव्हीने आता अखिल भारतीय स्तरावर डिजीटल प्लॅटफॉर्म उभारून त्यात मराठीचाही समावेश केला आहे, तो अत्यंत आनंददायी असा अनुभव आहे. ईटीव्ही हा एक ब्रँण्डआहे. डिजीटल मीडियामध्ये त्यांनी विश्वासाहर्ता जपावी. बातमी मागची बातमी सांगावी.
२४ तास लाईव्ह बुलेटीन, भारतातील प्रत्येक जिल्हास्तरापर्यंत असलेले नेटवर्क आणि लाईव्ह बातम्या हे ईटीव्हीचे वैशिष्ट्य असणार आहे. व्हिडिओ लाईव्ह बुलेटीनमधून २४ तास झटपट घडामोडी लोकांपर्यंत पोहचवल्या जाणार आहेत.
ईटीव्ही भारत हे डिजिटल व्यासपीठ आहे. गावापासून ते दिल्लीपर्यंतच्या सर्व तऱ्हेच्या बातम्या, विविध प्रकारची माहिती आणि मनोरंजन या व्यासपीठावर उपलब्ध राहील. मोबाईल अॅप आणि वेब पोर्टल्सच्या माध्यमातून या व्यासपीठापर्यंत आपण पोहोचू शकाल. इथे लिखित माहिती असेलच. पण त्याहूनही अधिक भर असेल तो व्हिडिओजवर. इटीव्ही भारत देशातील सर्व महत्त्वाच्या भाषांमध्ये उपलब्ध असेल. ज्याची जी गरज असेल ती ती बातमी व माहिती इथे मिळेल. त्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात इटीव्ही भारतच्या पत्रकारांचे जाळे उभारण्यात आले आहे. या प्रकारे केवळ डिजिटल क्षेत्रात काम करणारी ही एकमेव संस्था आहे.
हे सर्व करताना विश्वासार्हता या मूल्याला ईटीव्ही भारतचे सर्वोच्च प्राधान्य राहील. अचूक, सत्य आणि निष्पक्ष बातमी देणे हेउद्दिष्ट राहील. त्यात कोणतीही तडजो़ड केली जाणार नाही. ईटीव्ही भारत हे देशातील सर्व भाषांमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये हिंदी, उर्दू, तेलूगू, तमीळ, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी, बंगाली, पंजाबी, आसामी, उडिया आणि इंग्रजी या भाषांचा समावेश आहे.
देशभरातील बातम्या, माहिती आणि मनोरंजन एका ठायी एकवटलेले असेल, अशी ईटीव्ही भारत ही एक वैशिष्टयपूर्ण जागा असेल. अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा त्यात वापर आहे.एकविसाव्या शतकात जन्माला आलेल्या तरुण पिढीचा उत्साह, उस्फूर्तता तिथे असेल. मात्र हे करतानापत्रकारितेतील सर्वोच्च मूल्यांची चौकटही कटाक्षाने पाळली जाईल.