ETV Bharat / state

आज...आत्ता...( रविवार १६ जून २०१९) दुपारी २ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या...

author img

By

Published : Jun 16, 2019, 2:01 PM IST

मंत्रिमंडळाचा विस्तार : विखे, क्षीरसागरांसह शेलारांनी घेतली शपथ. राजकीय इतिहासात पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्रिपदे. शिवसेनेचे पुन्हा एकदा 'मिशन राम मंदिर'; 'मंदिर तो हो के रहेगा'चा उद्धव यांचा अयोध्येत नारा. पाकवर 'सर्जिकल स्ट्राइक' करण्यासाठी मैदानात उतरणार 'विराट'सेना, 'या' खेळांडूवर असणार सर्वांच्या नजरा. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची खलबते सुरू; दिग्गज नेत्यांची उपस्थिती.

दुपारी २ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या...

मंत्रिमंडळाचा विस्तार : विखे, क्षीरसागरांसह शेलारांनी घेतली शपथ

मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रलंबीत असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज झाला. यामध्ये १३ जणांना नव्याने मंत्रीपदाची संधी देण्यात आली. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नवीन मंत्र्यांचा शपथविधीला सुरूवात झाली. राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर १३ नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्या सर्वानी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. हेही वाचा...

राजकीय इतिहासात पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्रिपदे

बीड - दिवंगत केशर काकू क्षीरसागर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी बीड जिल्ह्याचे राजकीय नेतृत्व राज्यस्तरावर केले. मात्र, एकाच वेळी बीड जिल्ह्याला २ कॅबिनेट मंत्री पदे बीडच्या राजकीय इतिहासात कधीच मिळालेले नाहीत. यावेळी शिवसेना-भाजपच्या सरकारमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे आणि शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने बीडच्या वाट्याला २ कॅबिनेट मंत्रीपदे आली असल्याने विकासाचा आलेख दुपटीने उंचावेल, अशी अपेक्षा बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना आहे. हेही वाचा...

शिवसेनेचे पुन्हा एकदा 'मिशन राम मंदिर'; 'मंदिर तो हो के रहेगा'चा उद्धव यांचा अयोध्येत नारा

मुंबई - शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घोषित केल्याप्रमाने ते सहकुटुंब अयोध्येला पोहोचले आहेत. पहाटे मुंबई विमानतळावरून त्यांनी अयोध्येला उड्डाण केले. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत उपस्थित होते. फैजाबाद विमानतळावर उतरल्यावर त्यांचे शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि खासदार विनायक राऊत यांनीही गुलाब पुष्प देऊन ठाकरे यांचे स्वागत केले. त्यानंतर ठाकरे यांचा ताफा आयोद्धेकडे रवाना झाला. हेही वाचा...

पाकवर 'सर्जिकल स्ट्राइक' करण्यासाठी मैदानात उतरणार 'विराट'सेना, 'या' खेळांडूवर असणार सर्वांच्या नजरा

मॅनचेस्टर - आयसीसी विश्वकरंडकातील सर्वात चर्चेत राहणाऱ्या सामन्यांपैकी एक असणार भारत-पाकिस्तान सामना आज मॅनचेस्टर येथे होणार आहे. विश्वकरंडकाच्या इतिहासात आजपर्यंत दोन्ही संघात ६ लढती झाल्या आहेत. परंतु, भारताने सर्व लढतीत विजय मिळवून आजपर्यंत पाकिस्तानवर वर्चस्व गाजवले आहे. आजच्या लढतीत भारत विजयी परंपरा कायम राखण्यासाठी तर, पाकिस्तान भारताविरुद्धच्या पराभवाची मालिका खंडीत करण्यासाठी मैदानात उतरेल. हेही वाचा...

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची खलबते सुरू; दिग्गज नेत्यांची उपस्थिती

मुंबई - पावसाळी अधिवेशनात सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीतील विरोधीपक्ष नेत्याची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचे नेते हजर आहेत. हेही वाचा...

Intro:Body:

News @2 PM

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.