ETV Bharat / state

इथेनॉल बंदी, कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावर सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी? - onion export ban

Ethanol Ban Issue: हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये इथेनॉल बंदी व कांदा निर्यात बंदीवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला. (onion export ban) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP leader Jayant Patil) यांनी दोन्ही मुद्द्यांवरून अनेक प्रश्न उपस्थित केले. (CM Eknath Shinde) यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी इथेनॉल बंदी व कांदा निर्यात बंदीवर सरकार पूर्णपणे पाठपुरावा करत असून वेळ पडल्यास सोमवारी दिल्ली दरबारी जाणार असल्याचं सांगितलं आहे.

Ethanol Ban Issue
शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2023, 9:28 PM IST

मुंबई Ethanol Ban Issue : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इथेनॉल बंदी व कांदा निर्यात बंदी वरून विधानसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, इथेनॉलच्या निर्मितीच्या निर्णयांमध्ये बदल झाले आहेत. ऊसाच्या रसापासून इथेनॉल तयार करण्यावर पुन्हा बंदी घालण्यात आलेली आहे. ऊस उत्पादक पूर्णतः निराशेत गेले आहेत. त्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. (CM Shinde visit to Delhi) केंद्र सरकारने अगोदर इथेनॉलला प्रोत्साहन दिलं. महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी इथेनॉलच्या कारखान्यांमध्ये गुंतवणूक केली. त्याला सबसिडी देण्याचं कामसुद्धा केंद्र सरकारने केलं. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. राज्य सरकारनेसुध्दा प्रोत्साहन दिलं. आता अचानक इथेनॉल बंद केल्यानं महाराष्ट्रातील ऊस उत्पादक संकटात आले आहेत. जो काही थोडासा दर मिळणार होता तीही आशा संपुष्टात आणण्याचे काम केंद्र सरकारनं केलं आहे. इथेनॉल संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेणार आणि केंद्राला कसं समजावणार असा प्रश्न उपस्थित केला. तसेच ३० डिसेंबर पर्यंत कांदा निर्यातीवर चाळीस टक्के एक्सपोर्ट ड्युटी होती. परंतु आता तर कांदा निर्यातच बंद करण्यात आली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून सरकारचं त्यांच्यावर पूर्णतः दुर्लक्ष झालं आहे.

काय म्हणाले अजित पवार? जयंत पाटील यांच्या प्रश्नावर सरकारकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, कांदा निर्यात बंदी बाबत सरकारकडून त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे. तसेच ऊसाच्या व इथेनॉलच्या बाबतीत जो प्रश्न उपस्थित केला आहे. त्याबद्दल केंद्र सरकारने बी हेवी मोलीसेस, सी हेवी मोलिसेस पासून इथेनॉल तयार करायला परवानगी दिलेली आहे व तसा निर्णय झालेला आहे. परंतु सिरप आणि ज्यूस याबाबत जो निर्णय झाला होता त्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिक्स करायला प्रोत्साहन दिलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीसुद्धा आता साखरेपासून इथेनॉल तयार करावं. आपण पंप देऊ असं सांगितलं व अचानक असा आदेश आलेला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी या विषयावर मी कालच बोललो. अमित शाह यांच्याशी संपर्क केला. मी त्यांना सांगितलं हा संपूर्ण देशामध्ये फार महत्त्वाचा विषय आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं फार मोठे नुकसान होणार आहे. अनेक जणांनी ५ टक्के स्वतःचे व ९५ टक्के वित्तीय संस्थेकडून घेऊन इथेनॉल प्लांट सुरू केलेले आहेत. त्यांनी जर सिरप व ज्यूस याला परवानगी नाकारली तर फार मोठे नुकसान होणार आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार : अजित पवार म्हणाले की, आज सकाळी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी या विषयावर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांशी पण चर्चा झाली असून आम्ही ठरवलं आहे. दिल्लीला जावे लागले तरी चालेल; पण मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी बोललो. मी त्यांना भेटणार आहे. नाहीतर सोमवारी मुख्यमंत्री आणि आम्ही दिल्लीला जाणार असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा:

  1. मोदींच्या राज्यात बनावट टोल नाका! दीड वर्षांपासून सुरू लोकांची फसवणूक
  2. पोलिसांनी केली नाना पटोलेंची उचलबांगडी, विविध प्रश्नावर युवक काँग्रेस आक्रमक
  3. ग्रामविकास विभागातील भरतीसाठी घेतलेलं परीक्षा शुल्क परत करणार, अंबादास दानवे यांच्या मागणीला यश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.