ETV Bharat / state

Thackeray Sena : विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश - पैठणमध्ये भाजपला खिंडार

संभाजीनगर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. मातोश्री येथे हा पक्षप्रवेश करण्यात आला. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, संपर्कप्रमुख डॉ विनोद घोसाळकर उपस्थित होते.

Thackeray Sena
विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा ठाकरे सेनेत प्रवेश
author img

By

Published : Dec 14, 2022, 3:56 PM IST

मुंबई : शिवसेनेत फूट पडून आमदार, खासदार, विविध पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांना राज्यातून मोठा पाठिंबा मिळतो आहे. दिवसागणिक शिवसेनेत पक्षप्रवेश सुरु आहे. आजही संभाजीनगर जिल्ह्यातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वैजापूर मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, तालुका अध्यक्ष पंचायत समिती ऍड प्रतापराव पाटील निंबाळकर, प्रतापराव पाटील धोर्डे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारचा कारभार, नितेश राणेंचे वक्तव्य, बच्चू कडूंच्या आरोपांवरुन खडे बोल सुनावले. संभाजीनगर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. मातोश्री येथे हा पक्षप्रवेश करण्यात आला. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, संपर्कप्रमुख डॉ विनोद घोसाळकर उपस्थित होते.

पैठणमध्ये भाजपला खिंडार : भाजपचे पैठणचे जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनाथ भुमरे पाटील, डॉ पांडुरंग राठोड, जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज भाजपला धक्का देत शिवबंधन हाती घेतले. गंगापूर तालुक्यातील माजी सरपंच प्रदीप निरफळ यांच्या सह प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी प्रवेश केला. तसेच हजारो कार्यकर्त्यांचा संभाजीनगर जिल्ह्यात लवकरच जाहीर पक्षप्रवेश होणार असल्याचे त्यांनी म्हटले.

नितेश राणेंना आम्ही सिरिअस घेत नाहीत : संभाजीनगर जिल्हा हा बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा आहे. उद्धव ठाकरेंवर विश्वास ठेवणारा आहे. केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री गावापुरती राहतील. जनता त्यांना घरी बसवेल, असे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरेंवर होणाऱ्या टीकेला, सुर्यावर थुंकले तरी काही फरक पड नाही, अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली. नितेश राणेंना आम्ही सिरिअस घेत नाहीत. बच्चू कडूंनी रवी राणांच्या आरोपांचे खडन करावे, असे आवाहन केले. दोन्ही सभागृहात महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्नांवर ठराव मांडू. मात्र, सर्व पक्ष सीमा भागातील लोकांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. सर्वपक्षीय या ठरावाला पाठिंबा देतील, असा आशावाद दानवे यांनी व्यक्त केला.

महाविराट मोर्चा होईल : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षीय नेते काम करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा मोर्चा महाविराट होणार आहे. महाराष्ट्र द्रोही सत्तेवर आहेत. सतत महापुरुषांचा अवमान करतात. उद्योग महाराष्ट्रातून पळवून नेण्यास मूक संमती देतात. माता भगिनींना चुकीचे शब्द वापरणाऱ्यांना संरक्षण देतात. अशा महाराष्ट्र द्रोही प्रवृत्ती विरोधात हा मोर्चा आहे. या मोर्चातून प्रक्षोभ समोर येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.