ETV Bharat / state

विधानसभेसोबत लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज - दिलीप शिंदे - loksabha by poll

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कामकाजात कोणतीही चूक होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येत असून या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असेल.

दिलीप शिंदे - अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त
author img

By

Published : Sep 25, 2019, 10:22 AM IST

Updated : Sep 25, 2019, 1:10 PM IST

मुंबई- राज्यातील जवळपास सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएमसोबतच मतपावती यंत्रणेचा (व्हीव्हीपॅट) वापर केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. यामध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक कार्यक्रम-2019, या अनुषंगाने विभागाने केलेली तयारी, मतदानामधील युवक व महिलांचा सहभाग वाढावा म्हणून राबविण्यात येणारा स्वीप (SVEEP) कार्यक्रम, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट बद्दल लोकांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी विभागाकडून सुरू असलेले प्रयत्न, आदर्श आचारसंहिता प्रचारादरम्यान राजकीय पक्षांकडून होणाऱ्या जाहिरातींवर लक्ष ठेवण्यासाठी होत असलेले प्रयत्न, दिव्यांग व महिला मतदारांकरिता असलेल्या विशेष सोयी, निवडणुकीच्या कार्यान्वयनामध्ये गती व सुसुत्रता येण्यासाठी निवडणूक आयोगाने विकसित केलेले नवीन आदी विषयाची माहिती दिली. या संदर्भात दिलीप शिंदे यांच्याशी चर्चा केलीय ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी..

हेही वाचा -पवारांवर ईडीच्या कारवाईचे बारामतीत पडसाद, कडकडीत बंद

शिंदे म्हणाले, राज्यात सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएमला मतपावती यंत्रणा जोडण्यात आली आहे. या मतपावत्या ७ सेकंदासाठी व्हीव्हीपैट मशीनच्या पडद्यावर दिसतील आणि त्यामुळे आपण ज्यांना मत दिले त्यांनाच ते जाते की नाही याची खातरजमा मतदारांना करता येईल. त्यानंतर व्हीव्हीपॅट मशिनला जोडलेल्या पेटीत या मतपावत्या आपोआप जमा होतील. मतदान केंद्रांवर जर ईव्हीएम मधील मतांबद्दल उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीला काही गंभीर आक्षेप असतील आणि ते त्यांनी मतमोजणी सुरू असतानाच आक्षेप नोंदवून मतपावत्यांच्या मोजणीसाठी मागणी केली, तर निवडणूक अधिकारी मतपावत्या मोजणीचा निर्णय घेऊ शकतात.राज्यात एकाच टप्प्यात 21 ऑक्टोंबर 2019 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. 4 ऑक्टोबर ही उमेदवारी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 5 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होईल. 7 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 24 ऑक्टोंबर 19 रोजी मतमोजणी होईल असं शिंदे म्हणाले.हेही वाचा - अजित पवारांसह अन्य नेत्यांवर ईडीची कारवाई कायदेशीरच - माधव भांडारी

8 कोटी 94 लाख मतदार

राज्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 पुरुष मतदार, 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 महिला तर 2 हजार 593 तृतीयपंथी असे एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. अद्यापही ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत नाही, त्यांना नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 4 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल. त्यामुळे ज्यांची नावे अद्याप यादीत नाहीत, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

मतदान केंद्रांत वाढ

शिंदे म्हणाले, सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी 91 हजार 329 मतदान केंद्रे होती. यंदा यामध्ये 5325 मतदान केंद्रांची वाढ होऊन एकूण 96 हजार 654 मतदान केंद्रे असतील. दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना सोयीचे व्हावे, यासाठी पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील पाच पेक्षा जास्त मतदान केंद्रे खालच्या मजल्यावर आणण्यात आली आहेत. तसेच मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था, व्हिल चेअर आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील. दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी pwd app ची सुविधा देण्यात आली आहे.

इव्हिएम-व्हीव्हीपॅट जनजागृती

विधानसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (इव्हिएम)चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात 1.80 लाख बॅलेट युनिट, 1.30 लाख कंट्रोल युनिट आणि 1.35 लाख व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाईल. या सर्व यंत्रणांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा - पवार यांच्या विरोधातील कारवाई तर सूड बुद्धीने; मराठा क्रांती मोर्चाने दर्शवला निषेध
मतदान टक्केवारी

विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत राज्यात 50.67 टक्के तर 2014 च्या निवडणुकीत 60.32 टक्के मतदान झाले होते. यावेळी यापेक्षा जास्त मतदान होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्मचारी सज्ज

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कामकाजात कोणतीही चूक होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येत असून या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

मतदार जनजागृती

निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी प्रत्येक मतदारसंघात विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये मतदान करण्यासाठी आवाहन, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनची (इव्हीएम) सुरक्षितता आदींबद्दल मतदारांना माहिती देण्यात येत आहे. इव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर पूर्ण राज्यात प्रथम होणार असल्यामुळे मतदारांमध्ये यासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मशिनवर यासंबंधीची माहिती देण्यात येत आहे. आतापर्यंत 9 लाख नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला असून त्यापैकी 6.30 लाख मतदारांनी या यंत्रावर प्रत्यक्ष मतदानाची तालीम घेतली आहे.

सी-व्हिजिल व हेल्पलाईन

निवडणुकीत सी व्हिजिल, सुविधा या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. नागरिकांना आचारसंहितेचा कुठे भंग होत असल्याचे दिसून आल्यास सी व्हिजिल या मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार करता येईल. राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापण्यात आले असून तक्रार निवारणासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. राज्यस्तरावर 24 तास ही सेवा सुरू राहणार आहे.

Intro:Body:

mh_mum_2_ec_dilip_shinde121_mumbai_7204684

dilipshindeinterview live 3G live7
Cameraman anil Nirmal

विधानसभेसोबत लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी निवडणुक आयोग सज्ज

- राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे

- राज्यातील जवळपास सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएमसोबतच मतपावती यंत्रणेचा (व्हीव्हीपॅट) वापर केला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली. ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याशी केलेल्या खास चर्चेत शिंदे यांनी विधानसभा आणि एका लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे लोकसभा निवडणूक आणि नियोजन यावर विस्तृत माहिती दिली.

विधानसभा निवडणुक कार्यक्रम-2019, या अनुषंगाने विभागाने केलेली तयारी, मतदानामधील युवक व महिलांचा सहभाग वाढावा म्हणून राबविण्यात येणारा स्वीप (SVEEP) कार्यक्रम,ईव्हीएम, व्हीव्हीपॅट बद्दल लोकांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी विभागाकडून सुरु असलेले प्रयत्न, आदर्श आचारसंहिता प्रचारादरम्यान राजकीय पक्षांकडून होणाऱ्या जाहिरातींवर लक्ष ठेवण्यासाठी होत असलेले प्रयत्न,दिव्यांग व महिला मतदारांकरिता असलेल्या विशेष सोयी, निवडणुकीच्या कार्यान्वयनामध्ये गती व सुसुत्रता येण्यासाठी निवडणूक आयोगाने विकसित केलेले नवीन आदी विषयाची माहिती दिली.

राज्यात सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएमला मतपावती यंत्रणा जोडण्यात आली आहे. या मतपावत्या ७ सेकंदासाठी व्हीव्हीपैट मशीनच्या पडद्यावर दिसतील आणि त्यामुळे आपण ज्यांना मत दिले त्यांनाच ते जाते की नाही याची खातरजमा मतदारांना करता येईल. त्यानंतर व्हीव्हीपॅट मशिनला जोडलेल्या पेटीत या मतपावत्या आपोआप जमा होतील. मतदान केंद्रांवर जर ईव्हीएम मधील मतांबद्दल उमेदवार किंवा त्याच्या प्रतिनिधीला काही गंभीर आक्षेप असतील आणि ते त्यांनी मतमोजणी सुरू असतांनाच नोंदवून मतपावत्यांच्या मोजणीसाठी मागणी केली तर निवडणूक अधिकारी मतपावत्या मोजणीचा निर्णय घेऊ शकतात, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राज्यात एकाच टप्प्यात 21 ऑक्टोंबर 2019 रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीसाठी 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. 4 ऑक्टोबर ही उमेदवारी नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 5 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होईल. 7 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 24 ऑक्टोंबर 19 रोजी मतमोजणी होईल असं शिंदे म्हणाले.

8 कोटी 94 लाख मतदार

राज्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत 4 कोटी 67 लाख 37 हजार 841 पुरुष मतदार, 4 कोटी 27 लाख 5 हजार 777 महिला तर 2 हजार 593 तृतीयपंथी असे एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदारांची नोंदणी झाली आहे. मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. अद्यापही ज्या नागरिकांचे नाव मतदार यादीत नाही, त्यांना नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 4 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येईल. त्यामुळे ज्यांची नावे अद्याप यादीत नाहीत, त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

मतदान केंद्रांत वाढ

शिंदे म्हणाले, सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी 91 हजार 329 मतदान केंद्रे होती. यंदा यामध्ये 5325 मतदान केंद्रांची वाढ होऊन एकूण 96 हजार 654 मतदान केंद्रे असतील. दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना सोयीचे व्हावे, यासाठी पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील पाच पेक्षा जास्त मतदान केंद्रे खालच्या मजल्यावर आणण्यात आली आहेत. तसेच मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगासाठी विशेष व्यवस्था, व्हिल चेअर आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील. दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी pwd app ची सुविधा देण्यात आली आहे.

इव्हिएम-व्हीव्हीपॅट जनजागृती

विधानसभा निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन (इव्हिएम)चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात 1.80 लाख बॅलेट युनिट, 1.30 लाख कंट्रोल युनिट आणि 1.35 लाख व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाईल. या सर्व यंत्रणांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून ती सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहेत.

मतदान टक्केवारी

विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत राज्यात 50.67 टक्के तर 2014 च्या निवडणुकीत 60.32 टक्के मतदान झाले होते. यावेळी यापेक्षा जास्त मतदान होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्मचारी सज्ज

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कामकाजात कोणतीही चूक होऊ नये, यासाठी काळजी घेण्यात येत असून या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

मतदार जनजागृती

निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार जनजागृतीसाठी प्रत्येक मतदारसंघात विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये मतदान करण्यासाठी आवाहन, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनची (इव्हीएम) सुरक्षितता आदींबद्दल मतदारांना माहिती देण्यात येत आहे. इव्हिएम व व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर पूर्ण राज्यात प्रथम होणार असल्यामुळे मतदारांमध्ये यासंबंधी जनजागृती करण्यात येत आहे. सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मशिनवर यासंबंधीची माहिती देण्यात येत आहे. आतापर्यंत 9 लाख नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला असून त्यापैकी 6.30 लाख मतदारांनी या यंत्रावर प्रत्यक्ष मतदानाची तालीम घेतली आहे.

सी-व्हिजिल व हेल्पलाईन

निवडणुकीत सी व्हिजिल, सुविधा या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. नागरिकांना आचारसंहितेचा कुठे भंग होत असल्याचे दिसून आल्यास सी व्हिजिल या मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून तक्रार करता येईल. राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापण्यात आले असून तक्रार निवारणासाठी 1950 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. राज्यस्तरावर 24 तास ही सेवा सुरू राहणार आहे.

Conclusion:
Last Updated : Sep 25, 2019, 1:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.