ETV Bharat / state

सरकार अस्थिर आहे? राहुल नार्वेकरांनी थेटच सांगितलं, संजय राऊतांनाही टोला

Rahul Narwekar : राज्यातील सत्तासंघर्षावर विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात सध्या सुनावणी सुरू आहे. हे सरकार अस्थिर असल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर आता खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी टिपण्णी केली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2023, 6:34 PM IST

मुंबई Rahul Narwekar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर आहे. या सरकारला विधिमंडळ विधानसभा सभागृहात बहुमताचा पाठिंबा आहे, असं स्पष्टीकरण राहुल नार्वेकर यांनी दिलंय. तसेच लवकरच शिवसेनेच्या गटांनी दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकांवर (MLA Disqualification Case) निर्णय घेऊ, असंही ठामपणे नार्वेकर यांनी सांगितलं. या दोन्ही मुद्द्यांवरुन विरोधक अध्यक्षांवर जोरदार टीका करत आहेत.

राहुल नार्वेकर यांचं स्पष्टीकरण : राज्यातील ट्रिपल इंजिनचं सरकार अस्थिर असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सातत्यानं केलाय. तसेच आमदार अपात्र याचिका सुनावणी घेण्यास विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला होता. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आता प्रत्युत्तर दिलंय. एकनाथ शिंदे सरकारकडं मॅजिक फिगर आहे. विधानसभेत त्यांच्याकडं बहुमताचा आकडा आहे. त्यामुळं हे सरकार स्थिर आहे, असं नार्वेकर म्हणाले.

संजय राऊतांना टोला : एखादं सरकार तेव्हाच पडतं जेव्हा ते विधानसभेतील नंबर गेममध्ये अपयशी ठरतं. सार्वजनिकपणे केलेल्या टिप्पण्यांमुळं सरकार कधीच कोसळत नाही. त्यामुळं राज्य सरकारकडं बहुमताची जादूई संख्या आहे. हे सरकार स्थिर आहे, असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी संजय राऊत यांना नाव न घेता टोला लगावलाय.

अपात्र प्रकरणी निर्णय लवकरच : आमदार अपात्र याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या मुदतीत सुनावणी पूर्ण करून निर्णय घेण्याची माझी योजना आहे. नैसर्गिक तत्त्वांवर परिणाम होणार नाही याची मी काळजी घेत आहे. लवकरच आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेईन, असंही राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेच्या दोन गटांनी एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी दाखल केलेल्या क्रॉस याचिकांवर 31 डिसेंबर किंवा त्यापूर्वी निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत.

हेही वाचा -

  1. Rahul Narvekar : राजकीय फटाके फुटायला अजून वेळ; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलं सूचक वक्तव्य
  2. Rahul Narwekar : आमदारांच्या अपात्रतेबाबत राहुल नार्वेकरांचं मोठं विधान; म्हणाले...
  3. आमदार अपात्र प्रकरण; राहुल नार्वेकर यांचा कारवाई लांबवण्याचा प्रयत्न, सुनिल प्रभूंचं विधीमंडळाला पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.