मुंबई - पुणे येथील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह त्यांचे जावई गिरीश चौधरी यांच्यावर कथित आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र उच्च न्यायालयाने खडसेंचे जावई असलेले गिरीश चौधरी यांचा जामीन मात्र फेटाळून लावला. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश अनुजा प्रभुदेसाई यांनी हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
भोसरी घोटाळा प्रकरणामध्ये तुरुंगात - माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी कथित भोसरी घोटाळा प्रकरणामध्ये तुरुंगात आहेत. त्यांनी याआधी खालच्या न्यायालयामध्ये दोनवेळा जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील त्यांनी केलेला अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. एकनाथ खडसे हे जेव्हा भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून होते. नंतर ते मंत्री झाले. त्यावेळेला त्यांच्यावर भोसरी पुणे जमीन खरेदी व्यवहारात कथित घोटाळा झाल्याचा आरोप केला गेला होता. तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने शेतजमिनीबाबत गैरव्यवहार केल्याचा देखील आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात मुंबईच्या सत्र न्यायालयातील पीएमएलए या विशेष न्यायालयामध्ये तो खटला सुरू आहे.
पदाचा गैरवापर करत गैरव्यवहार - खटल्यामध्ये आरोपी असलेले एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांचा देखील समावेश आहे. त्यात कथितरित्या सहभाग असल्याचे अंमलबजावणी संचलनालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी यांच्या जामीन अर्जास उच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये विरोध केला. खडसे त्यावेळी महसूल मंत्री पदावर होते. त्यावेळेला पदाचा गैरवापर करत गैरव्यवहार केला. हा गैरव्यवहार 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट संदर्भातला होता. हे प्रकरण 2016 मध्ये झाले होते. या एकूण कठीण गैरव्यवहारामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई देखील सहभागी असल्याचा आरोप आहे. चौधरी यांनी उच्च न्यायालयामध्ये यावेळी जामीन मिळण्यासाठीचा अर्ज केला होता. मात्र अंमलबजावणी संचलनालयाने या अर्जाला विरोध केला.
मात्र ईडीच्या वतीने आरोपी असलेल्या गिरीश चौधरी यांच्याबाबत न्यायालयाला विनंती केली की, 'संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांना तुरुंगात ठेवणे जरुरी आहे. सबब त्यांना जामीन नाकारावा. 'मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनुजा प्रभू देसाई यांच्या एकल खंडपीठाने अखेर गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज नाकारला. त्यामुळे एकनाथ खडसे आणि त्यांचे जावई यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.