ETV Bharat / state

Dyaneshwar Mhatre : कोकण शिक्षक मतदार संघासाठी भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाची निवडणूक ( Konkan Teacher Constituency Election) ३० जानेवारी रोजी होणार आहे. नाशिक, अमरावती, नागपूर, औरंगाबाद आणि कोकण या विभागातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ ही निवडणूक होत असून नाशिक आणि अमरावती हे पदवीधर तर नागपूर, कोकण आणि औरंगाबाद या शिक्षक मतदार संघात निवडणूक होत आहे.

Dyaneshwar Mhatre nominated by BJP
भाजपकडून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी
author img

By

Published : Jan 9, 2023, 5:21 PM IST

मुंबई : कोकण शिक्षक मतदार संघासाठी (Konkan Teacher Constituency Election) भाजपने ज्ञानेश्वर म्हात्रे यांना आज (Dyaneshwar Mhatre nominated by BJP) उमेदवारी घोषित केली. याची घोषणा आज मुंबईत पत्रकार परिषदेमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत शेखर बावनकुळे (Chandrakant Shekhar Bawankule) यांनी केली.

नागपूर, नाशिक ची घोषणा २ दिवसात : याप्रसंगी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर या ५ जागांसाठी ३० जानेवारी रोजी निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी शिंदे - फडणवीस यांच्या समन्वयाने आम्ही उमेदवार घोषित करत आहोत. कोकण शिक्षक मतदार संघासाठी ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी दिली गेली आहे. मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी यापूर्वीच किरण पाटील, अमरावती मध्ये रणजित पाटील यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.नागपूर व नाशिक मतदार संघासाठी लवकरच उमेदवार घोषित करू असेही बावनकुळे म्हणाले. १२ जानेवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. ३० जानेवारी रोजी मतदान होणार आहे २ फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे.

इतरही नावे चर्चेत : भाजप शिक्षक आघाडी कडून या निवडणुकीसाठी अनिल बोरणारे यांचे नाव चर्चेत होते. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पुतण्याचे नाव सुद्धा या जागेसाठी चर्चेत होते. आता यापूर्वी शिक्षक सेनेचे पदाधिकारी असलेले ज्ञानेश्वर म्हात्रे यांना भाजपकडून उमेदवारी दिली गेली असून शिंदे गटाने त्यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

शिक्षक परिषदेचा दबदबा असलेला मतदार संघ : कोकण शिक्षक मतदार संघावर मागील दोन दशकांपासून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा दबदबा राहिलेला आहे. याच संघटनेकडून या मतदार संघात वसंतराव बापट, सुरेश भालेराव व रामनाथ मोते हे विधान परिषदेत गेले होते. मोते आणि बापट हे सलग दोनवेळा म्हणजे २४ वर्ष आणि भालेराव हे एक वेळा निवडून आले होते. मात्र मागच्या निवडणुकीत संघटनेच्या अध्यक्षांनीच केलेल्या चुकांमुळे ही जागा शेकापच्या बाळाराम पाटील यांच्याकडे गेली होती. त्यामुळे सहजपणे निवडून येणाऱ्या रामनाथ मोते यांना शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्यामुळे पराभव स्वीकारावा लागला होता. आता वेणूनाथ कडू यांनी शिक्षक परिषदेकडून आपला उमेदवारी अर्ज भरला असून कडू यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा अशी विनंती भाजप व शिंदे गटाकडून केली जाणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे. त्यावर वेणूनाथ कडू काय निर्णय घेतात हे पाहणे सुद्धा महत्वाचे असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.