ETV Bharat / state

स्टील फर्निचरमधून पाठवले ड्रग्स; इंडो ऑस्ट्रेलियन ड्रग्ज सिंडिकेटचा मुंबई एनसीबीने केला पर्दाफाश - ड्रग्ज तस्करीचा भंडाफोड

Drug Smuggling Busted: एनसीबी मुंबईने इंडो-ऑस्ट्रेलिया ड्रग्ज सिंडिकेटचा भांडाफोड करत 9.877 किलो एम्फेटामाइन (Amphetamine), 2.548 किलो वजन असलेल्या झोलपीडेम टारटेरेटच्या (Zolpidem Tarterate) 9 हजार 800 टॅबलेट आणि 6.545 किलोच्या ट्रॅमेडोलच्या (Tramadol) 18 हजार 700 टॅबलेट जप्त केल्या. (Indo Australian drug syndicate) या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर अमित घावटे यांनी दिली आहे.

Drug Smuggling Busted
मुंबई एनसीबीने केला पर्दाफाश
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 10:31 PM IST

मुंबई Drug Smuggling Busted: ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या पार्सलमधून ९.८७७ किलो एम्फेटामाइन जप्त करून पुढील तपासामुळे मुंबईतून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. (drug smuggling through furniture) 9 हजार 800 झोलपीडेम टारटेरेटच्या 9 हजार 800 टॅबलेट आणि ट्रामाडोलच्या 18700 टॅबलेट जप्त करत आणखी 2 साथीदारांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. या तपासात NCB-मुंबईने भारतातून ऑस्ट्रेलियात फार्मा ड्रग्जच्या अवैध तस्करीमध्ये गुंतलेले आंतरराष्ट्रीय जाळे उघड केले. (NCB Mumbai action)

फर्निचरमध्ये लपविली ड्रग्जची पाकिटे: सुरुवातीला, गुप्त माहिती गोळा करण्यात आली होती. ज्यामध्ये भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये फार्मास्युटिकल ड्रग्जच्या स्वरूपात बेकायदेशीररित्या ड्रग्ज पाठवले होते. त्यानुसार, आणखी गुप्त माहिती मिळवण्यात आली. नंतर एक माहिती मिळाली की, आंतरराष्ट्रीय कुरिअरद्वारे एक माल ऑस्ट्रेलियाला पाठवला जात आहे. एक पार्सल एनसीबीने हेरले आणि पार्सल डीएचएल कुरिअर, मुंबई येथे रोखण्यात आले. पार्सल उघडले असता संशयास्पद स्टील टेबल फर्निचर आढळले. ते फर्निचर बारकाईने तपासले असता टेबलमध्ये विशेषतः डिझाइन केलेल्या पोकळ्यांमध्ये पाकिटे लपविलेले आढळले.

पाकिटात आढळले एम्फेटामाइन पावडर: पाकिटे उघडून पाहिली तेव्हा त्या सर्वांमध्ये पांढरा पावडर पदार्थ होता. ज्याची चाचणी केली असता, एकूण 9.877 किलो वजनाचे एम्फेटामाइन असल्याचे कळले. तत्काळ, सविस्तर तपास सुरू करण्यात आला. व्ही. सिंग याला 19 डिसेंबरला मुंबईतून अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता त्याने आपल्या सहभागाची कबुली दिली आणि त्याच्याकडून मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे जी. मिश्रा आणि पी. शर्मा नावाच्या त्याच्या दोन साथीदारांना मुंबईत अटक करण्यात आली.

ड्रग्जची खेप परदेशात पाठविण्याची होती तयारी: आरोपींची अधिक चौकशी केली असता त्यांच्या परिसरातून अवैधरित्या पाठवण्यात येणारी फार्मास्युटिकल ड्रग्जची एक मोठी खेप सापडली. जी परदेशात पाठवण्याच्या तयारीत होती. या पार्सलमध्ये एकूण 9800 झोलपीडेम टारटेरेट गोळ्या आणि 18700 ट्रामाडॉल गोळ्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी जी. मिश्रा आणि पी. शर्मा या दोघांना 20 डिसेंबरला अटक करण्यात आली. तपासादरम्यान असे निदर्शनास आले आहे की, या अटक व्यक्तींना आंतरराष्ट्रीय पार्सल यंत्रणेच्या कार्याची चांगली माहिती आहे आणि ते यापूर्वी देखील अंमली पदार्थांच्या तस्करीत सामील होते. हे सिंडिकेट गेल्या २-३ वर्षांपासून सुरू होते आणि अशा ड्रग्जची खेप पाठवण्यासाठी कागदपत्रांचा गैरवापर करत होते. पुढील सखोल तपास सुरू आहे.

हेही वाचा:

  1. योजना केंद्र सरकारच्या, मग संकल्प यात्रेच्या रथावर मोदींचं नाव का? पिसाळवाडी ग्रामस्थांनी नाव झाकायला लावले
  2. जितेंद्र आव्हाड यांचा खळबळजनक दावा; शिंदे गट, अजित पवार गटाची डोकेदुखी वाढणार?
  3. वीस दिवसांत नऊ रुग्ण, कोरोना परत येतोय? ठाणे पालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.