मुंबई : मुंबईच्या दिंडोशी पोलीस स्टेशनने रविवारी संध्याकाळी एका 39 वर्षीय अमली पदार्थ तस्कराला अटक (Drug smuggler arrested ) केली असून आरोपीकडून 20 लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. आरोपीला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला 1 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
आरोपी अटकेत - गोरेगाव परिसरातील संतोष नगर येथे एक व्यापारी अंमली पदार्थ व्यवहार करण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती दिंडोशी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपी तस्कराला अटक ( Drug smuggler arrested in Goregaon ) करण्यात आली.
ड्ग्ज जप्त - आरोपीकडून एमडी नावाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, आरोपीने ड्रग्ज कुठून आणले होते आणि तो कोणाला पुरवणार होता याचा पोलीस तपास करत आहे.