ETV Bharat / state

Drought In Nashik District : विरोधक आक्रमक झाल्यानं सरकार नमलं: अखेर 'हे' तालुके दुष्काळसदृष्य जाहीर झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा

Maharashtra Drought 2023 : पाऊस नसल्यानं राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारनं 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. आता मात्र नाशिक जिल्ह्यातील आणखी 46 मंडळं दुष्काळसदृश्य म्हणून गुरुवारी जाहीर करण्यात आली आहेत.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2023, 12:29 PM IST

Updated : Nov 10, 2023, 1:14 PM IST

Drought In Nashik District
संपादित छायाचित्र

मुंबई Drought In Nashik District : सरकारनं यापूर्वीच 40 तालुक्यांतील 269 महसुली मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील येवला, सिन्नर व मालेगावचा समावेश झालेला होता. मात्र विरोधक आक्रमक झाल्यानंतर सरकारनं नमतं घेत आणखी 46 मंडळं दुष्काळसदृष्य म्हणून गुरुवारी घोषित केली आहेत. ही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. त्यातही मंत्री छगन भुजबळ आग्रही असल्यानं सरकारनं मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय जाहीर केला.

मंत्री छगन भुजबळ होते आग्रही : नाशिक जिल्ह्यातील 46 महसूल मंडळं गुरुवारी दुष्काळसदृष्य म्हणून घोषित करण्यात आली. मंत्रालयामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये आपतग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यातील या सर्व मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर व्हावा, यासाठी मंत्री छगन भुजबळ हे आग्रही होते.

40 तालुक्यांतील 269 महसुली मंडळात दुष्काळ जाहीर : दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार ज्या तालुक्यांमध्ये मध्यम किंवा गंभीर दुष्काळी परिस्थितीची शक्यता संभवते अशा 40 तालुक्यांमध्ये यापूर्वीच Trigger-2 लागू झाला आहे. त्यानुसार यापूर्वीच 40 तालुक्यांतील 269 महसुली मंडळांना दुष्काळात करण्यात येणाऱ्या उपयायोजनांचा लाभ मिळणार आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील येवला, सिन्नर आणि मालेगावचा समावेश झाला होता.

पाऊस उशिरा पडल्यानं पेरणीवर परिणाम : नाशिक जिल्ह्यात यावर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झालेलं आहे. अनेक गावांमध्ये उशिरा पाउस पडल्यानं पेरणी उशिरा झालेली आहे. पेरणीनंतर चार ते पाच आठवडे पावसाचा खंड पडल्यानं असंख्य शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागलेल्या आहेत. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात देखील पाउस न आल्यानं कापूस, मका, कांदा, भूईमुग, ज्वारी आदी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे.

पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई : पाऊस कमी पडल्यानं जमिनीतील पाणी पातळीत घट झालेली आहे. खरीप हंगामातील संपूर्ण पिकं वाया गेलेली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर बनलेला आहे. पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे. अनेक गांवांना टँकरनं पाण्याचा पुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बळीराजा शेतकरी अस्मानी संकटात सापडलेला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचा विचार करता, लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडं केलेली होती.

या मंडळांचा झाला समावेश : गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये नाशिकमधल्या निफाड तालुक्यातील लासलगाव, देवगाव, नांदूर मधमेश्वर, निफाड, चांदोरी, रानवड, पिंपळगाव बसवंत, सायखेडा, ओझर, नांदगाव तालुक्यातील नांदगाव, मनमाड, वेहेलगाव, जातेगाव, हिसवल बुद्रुक, नाशिक तालुक्यातील नाशिक, देवळाली, पाथर्डी, माडसांगवी, मखमलाबाद, सातपूर, गिरणारे, कळवण तालक्यातील कळवण, नविबेज, मोकभनगी, कनाशी तर बागलाण तालुक्यातील सटाणा, नामपूर, ताहाराबाद, जायखेडा, वीरगाव, मुल्हेर, चांदवड तालुक्यातील चांदवड, रायपूर, दुगाव, वडनेर भैरव, वडळी भोई, दिघवद, देवळा तालुक्यातील देवळा, लोहोनेर, उमराणे या 46 महसूल मंडळांचा दुष्काळसदृश म्हणून सामावेश करण्यात आला आहे. या महसुली मंडळातील गावांना दुष्काळी भागातील गावांसाठी देय असलेल्या सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्या असल्याची माहिती देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

काही महसूल मंडळामध्ये नाही पर्जन्यमापक यंत्र : यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, "नवीन निर्माण झालेल्या काही महसूल मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्र नाही. त्या मंडळांमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवून या समितीची पुन्हा बैठक घेऊन उरलेल्या महसूल मंडळांचा देखील सामावेश आम्ही लवकरात लवकर या यादीमध्ये करु", असंही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केलं. या बैठकीला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह उपसमितीचे अध्यक्ष आणि मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, कृषी मंत्री धनंजय मुंडे, रोहयो मंत्री संदीपान भूमरे आदींसह संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. Cabinet Meeting In Sambhaji Nagar : मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान शहरात निघाले मोर्चे
  2. Drought In Beed District: बीड जिल्ह्यात पाऊस नसल्याने दुष्काळजन्य परिस्थिती; शेतकरी चिंतेत
  3. CM Shinde Visited Parner Taluka: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केली पारनेर तालुक्यातील शेतातील पिकांची पाहणी

Last Updated : Nov 10, 2023, 1:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.