मुंबई: मुंबई ऑटो रिक्षाटॅक्सी टॅक्सीमेन्स युनियनचे (Mumbai Autorickshaw Taximen's Union) अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले की, महानगर गॅसने (Mahanagar Gas) एप्रिल महिन्यात सलग तिसऱ्यांदा सीएनजीच्या दरात वाढ करत गॅस 30 टक्क्यांनी महाग केला. या दरवाढीनंतर 72 रुपये प्रति किलो असलेला सीएनजी आता 78 रुपये प्रति किलो दराने खरेदी करावा लागत आहे. अनेक खाजगी वाहन चालकांनी या दरवाढीनंतर वाहने जागीच उभी ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. याउलट रिक्षा व टॅक्सी चालकांना सीएनजीशिवाय पर्याय नसून मर्यादित भाड्यामध्ये प्रवासी वाहतूक करावी लागत आहे.
एकीकडे प्रवासी भाडे स्थिर असताना या महिन्यात सीएनजीचे दर 30 टक्क्यांनी भडकल्याने रिक्षा व टॅक्सी चालकांना नुकसान सहन करावे लागत आहे. परिणामी सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा व टॅक्सींना अनुदानित दराने गॅस पुरवठा करण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र, आमचा मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने उद्या आम्हाला मोर्चा काढावा लागत आहेत. राव यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य सरकारचा 10 टक्के हिस्सा महानगर गॅस लिमिटेड (एम.जी.एल) या कंपनीत आहे.
टॅक्सी ही सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा आहे. बाहेर देशातून आयात होणाऱ्या सीएनजी गॅस भारतमध्ये उपलब्ध होणाऱ्या सीएनजी गॅसच्या तुलनेत महाग आहे. देशात उपलब्ध होणाऱ्या सीएनजी गॅसचे दर भारत सरकार ठरवते. त्यामुळे मुंबईतील टॅक्सी चालकांना भारत सरकारने ठरवलेल्या किमतीत सीएनजी गॅस उपलब्ध करून द्यावा अशी मागणी पत्राद्वारे महानगर गॅस लिमिटेड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. तरी, सुद्धा या पत्रांची दखल न घेतल्यामुळे उद्या महानगर गॅस लिमिटेडच्या वांद्रे कुर्ला संकुलमधील कार्यालयासमोर मोर्चा काढून आंदोलन करणार आहेत.
हेही वाचा : Mumbai Corona Update: मुंबईत ७४ नवे रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद