ETV Bharat / state

गेल्या वर्षीच्या तुलनेत 31 डिसेंबर 2019 ला मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या संख्येत वाढ

२०१८ च्या ३१ डिसेंबरशी तुलना केल्यास २०१९ मध्ये मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्याच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. ३१ डिसेंबर २०१८ ला ४३३ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती.

drink and drive fine in mumbai on 31 december 2019
2018 च्या तुलनेत 31 डिसेंबर 2019 ला मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या संख्येत वाढ
author img

By

Published : Jan 1, 2020, 4:17 PM IST

Updated : Jan 1, 2020, 4:34 PM IST

मुंबई - शहर पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या रात्री मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या तब्बल ७७८ वाहन चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबई पोलिसांकडून शहरातील विविध परिसरामध्ये जवळपास शंभर ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. या नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी शहरातील तब्बल ५,३३८ वाहन चालकांची तपासणी केली. यामध्ये तब्बल ७७८ वाहन चालक मद्य पिऊन वाहन चालवताना आढळून आले. तेव्हा पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.

मुंबई शहरात कारवाई करण्यात आलेल्या ७७८ मद्यपी वाहन चालकांमध्ये, ५७८ दुचाकी वाहन चालक आहेत. तर राहिलेले दोनशे चारचाकी वाहन चालकांचा यात समावेश आहे. मुंबईतील कुलाबा (१२) , काळबादेवी( १७) , मलबार हिल( २४) , भायखळा ( २४) , माटुंगा ( २४)ट्रॉम्बे( १८) , मानखुर्द ( २६), व घाटकोपर (२७), सहार (३५), दहिसर (५८) या ठिकाणी सर्वाधिक गुन्हे नोंदवण्यात आले.

ड्रंक अँड ड्राइव्हच्या संदर्भात पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती देताना आमचे प्रतिनिधी महेश बागल...

दरम्यान, २०१८ च्या ३१ डिसेंबरशी तुलना केल्यास २०१९ मध्ये मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्याच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. ३१ डिसेंबर २०१८ ला ४३३ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली होती. मुंबई पोलिसांकडून दर दिवशी ड्रंक अँड ड्राइव्हच्या संदर्भात नाकाबंदीद्वारे कारवाई केली जाते. मात्र पोलिसांच्या कारवाईनंतरही मद्यपी चालकांवर याचा कुठलाही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे.

Intro:31 डिसेंबर 2019 च्या रात्री मुंबई पोलिसांकडून मुंबईतील विविध परिसरामध्ये जवळपास शंभर ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती या नाका-बंदी दरम्यान यासंदर्भात मोहीम राबविण्यात आली होती 31 डिसेंबरची रात्र असल्यामुळे मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या यांचे प्रमाण अधिक असल्याने मुंबई पोलिसांनी मुंबई शहरात तब्बल 5338 वाहनचालकांची तपासणी केली असता यामध्ये तब्बल 778 वाहनचालकांवर मद्य पिऊन वाहन चालवण्याच्या गुन्ह्याखाली खाली कारवाई करण्यात आलेली आहे.

Body:मुंबई शहरात कारवाई करण्यात आलेल्या 778 मद्यपी वाहन चालकांमध्ये तब्बल 578 हे दुचाकी वाहन चालक मध्ये पिऊन वाहन चालवत होते तर तब्बल दोनशे चार चाकी वाहन चालकांवर मद्य पिऊन वाहन चालवण्याच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्यात आलेली आहे . मुंबईतील कुलाबा (12) , काळबादेवी( 17) , मलबार हिल( 24) , भायखळा ( 24) , माटुंगा (24)n ट्रॉम्बे( 18) , मानखुर्द ( 26) व घाटकोपर (27) सहार(35) दहिसर (58) अशा ठिकाणी सर्वाधिक मद्यपी वाहनचालक आढळून आलेले आहेत. 31 डिसेंबर 2018 रोजी ची तुलना जर 31 डिसेंबर 2019 सोबत केली तर 31डिसेंबर 2018 रोजी केवळ 433 जणांवर मद्य पिऊन वाहन चालवण्याच्या गुन्ह्याखाली कारवाई करण्यात आली होती. मात्र हेच प्रमाण 2019 साली वाढले असून 778 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे . मुंबई पोलिसांकडून दर दिवशी ड्रंक अँड ड्राइव्ह च्या संदर्भात नाकाबंदी द्वारे कारवाई केली जाते. मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर ही मद्यपी चालकांवर याचा कुठलाही परिणाम होत नसून अशा तळीराम वाहनचालकांवर अंकुश बसत नसल्याचंही समोर येत आहे.

Conclusion:( पिटुसी जोडला आहे.) ( ही सुधारित बातमी घ्यावी.)
Last Updated : Jan 1, 2020, 4:34 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.