ETV Bharat / state

देशात 'ई' वाहनांमुळे बॅटरीचा कचरा वाढणार याची चिंता - पद्मश्री डॉ अनिल जोशी - Environment Protection

Dr Anil Joshi : डिझेल पेक्षा ई वाहन पर्यावरणासाठी चांगली असली तरी, येणाऱ्या काळात बॅटरी नावाचा कचरा वाढणार आहे. त्याची देखील चिंता करायला पाहिजे असं मत देहरादून येथील पर्यावरणतज्ज्ञ पद्मश्री डॉ. अनिल जोशी यांनी ‘पद्म फेस्टिव्हल-२०२३' (Padma Festival 2023) मधे व्यक्त केलं. जगाला विकासाची घाई झाली आहे. प्रगत होण्याच्या या धडपडीत सारासार विचार न करता धोरणे आखली जात आहेत. विलासी जीवनाकरिता होत असलेला तंत्रज्ञानाचा उपयोग जगासाठी घातक ठरतोय, असे परखड मत डॉ. अनिल जोशी यांनी व्यक्त केलं.

Dr Anil Joshi
पद्मश्री डॉ अनिल जोशी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2023, 9:28 PM IST

माहिती देताना पद्मश्री डॉ अनिल जोशी

छत्रपती संभाजीनगर Dr Anil Joshi : देशात ई वाहनांचा वापर वाढला आहे, डिझेलच्या मनात ही वाहन प्रदूषण (Pollution) कमी करतात ही चांगली बाब आहे. मात्र या वाहनांमुळे बॅटरीचा कचरा आगामी काळात वाढणार आहे, याची देखील चिंता केली पाहिजे. आपण आधीच प्लास्टिक कचऱ्यामुळं त्रस्त आहोत. प्लास्टिक वापर सुरू झाल्यानंतर निसर्गाला अशी अडचण होईल हे माहीत नव्हतं, त्यामुळं आज प्लास्टिकचं डोंगर उभं राहिलय. मात्र आता आपल्याला जाणीव झाली आहे, त्यामुळं या बॅटरीचे डोंगर वाढणार नाही याची देखील काळजी केली पाहिजे असं मत डॉ. अनिल जोशी यांनी व्यक्त केलं.

पर्यावरण समतोल असल्याने अडचणीत वाढ : महाराष्ट्र, तमिळनाडू, हिमाचल, केरळ सारख्या राज्यात पर्यावरण समतोल नेहमी पाहायला मिळतो. केरळ, तामिळनाडूमध्ये पूर येतोय, हे दिवस तसे नाहीत तरी देखील ही परिस्थिती आहे. तर सिक्कीम, दुबई सारख्या भागात देखील सध्या पूर येतोय. अर्थव्यवस्था वाढवण्याच्या मागे पडलेले देश मात्र निसर्गाच्या बाबतीत मागे पडत आहे. अर्थव्यवस्था चांगली राहिली तर पैसे वाढतील, मात्र पर्यावरण चांगले राहिले तर आपला जीव वाचणार आहे. त्यामुळं निसर्गाबाबत बोललं पाहिजे आणि काम देखील केलं पाहिजे निसर्गाचा समतोल बिघडला असल्याने, आता आठ महिने गर्मी असते. ती शरीराला हानिकारक असते. पृथ्वीचे शोषण केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. एखादं झाड आलं तर आपल्याला चांगलं वाटतं हे ओळखून झाडं वाढवली पाहिजे असं देखील मत डॉ. जोशी यांनी व्यक्त केलं.

उत्तराखंड जगातील पहिले राज्य : केवळ आपली शहरे नव्हे तर अवघ्या जगभरातील पाणीसाठा झपाट्याने दूषित होत आहे. नद्यांची पात्रे वाळवंट बनत आहेत. विकासाच्या घाईत याकडं आपल्या सर्वांचेच दुर्लक्ष झालं आहे. मंगळावर जाण्यासाठी खूप धडपड सुरू असणाऱ्या देशात अनेक कामगार बोगद्यात अडकून पडले, याकडं त्यांनी लक्ष वेधलं. सगळीकडे आर्थिक संकटांवर प्रचंड मंथन होतं, सातत्याने चर्चा होते. पण, पर्यावरण रक्षणासाठी आपण एकमेकांकडे बोट दाखवतो किंवा शासन यंत्रणेला दोष देतो. ‘GEP’ (Gross Environment Product) ही संकल्पना त्यामुळेच महत्त्वाची आहे. उत्तराखंड राज्याप्रमाणे अन्य शहरे-राज्यांतील नागरिक, विविध संस्था, शासनाने ती स्वीकारावी, याकरिता माझ्या संस्थेची धडपड सुरू आहे. पर्यावरण रक्षणासाठी काम करताना आम्ही त्या त्या भागातील स्थानिक रहिवासी, ग्रामस्थांच्या अडचणी, त्यांच्या गरजा जाणून घेतो. सरसकट एकच सूत्र सगळीकडे लागू करून पर्यावरण रक्षण करणे अवघड ठरते, असं मत पद्मश्री डॉ. अनिल जोशी यांनी व्यक्त केलं.

कोविड निसर्गाचाच भाग : कोविड रोगाने (COVID -19)जगाला अडचणीत आणलं होतं. मात्र कोविड हे अचानक आलेले संकट नाही. प्रगत होण्याच्या विकास घडवण्याच्या अनेक दिवसांपासून चाललेल्या हव्यासाचाच तो परिणाम होता. जगभरात अशा अनेक चुका झाल्या आहेत, होत आहेत. त्या होऊ नयेत, याची खबरदारी घेणं हेच पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचं पाऊल ठरेल. ‘विद्यार्थ्यांनी पर्यावरणाबाबत सजग व्हावे, यासाठी काय करता येईल? अशी गंभीरता आली तर या क्षेत्रात नव्या विचारांचे तरुण येतील. त्यांना उत्तम करिअरच्या संधी तर मिळतीलच शिवाय पर्यावरण संवर्धनही होईल, असे काही होऊ शकते का? विकासाच्या वेडापायी आपण वेगाने ऱ्हासाकडे जात आहोत. रासायनिक खतांमुळे शेतीचे भरून न काढता येणारे नुकसान होत आहे. हे सगळं बदलण्यासाठी समाजसेवी संस्था, पर्यावरणतज्ज्ञ आणि शासनाने दीर्घकालीन धोरण ठरवून निसर्गस्नेही पर्याय शोधून काढणं गरजेचं आहे. तंत्रज्ञानाचा निसर्गस्नेही वापर व्हावा, यासाठी नवविचारांच्या तरुणांची गरज भासणार आहे, असे विचार डॉ. जोशी यांनी मांडले.

हेही वाचा -

  1. Eco Friendly E Buses : ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार १२३ पर्यावरणपूरक ई- बसेस
  2. Thane News: ठाणेकरांची इलेक्ट्रिक बसची प्रतीक्षा संपली; प्रवाशांना आता सुखकर प्रवास
  3. गोंदियातील पोलीस 'हायटेक' , ई-चालान प्रकल्पांतर्गत २००हून अधिक वाहन चालकांवर कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.