ETV Bharat / state

Border dispute : 'गरज पडली तर आमचे उत्तर पण तितकेच तीव्र असेल हे विसरू नका' सीमावादात राज ठाकरेंचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा - Basavaraj Bommai

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. सीमावादावर समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या मंत्र्यांची नियुक्ती केली. या सीमावादाच्या प्रकरणात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेदेखील उडी घेतली असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांना खळखट्याचा इशारा दिला आहे. (Raj Thackeray's warning to Karnataka Chief Minister on border issue)

Raj Thackerays warning to Karnataka Chief Minister on border issue
सीमावादात राज ठाकरेंचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा
author img

By

Published : Dec 7, 2022, 3:35 PM IST

मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. सीमावादावर समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्र सरकारने चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या मंत्र्यांची नियुक्ती केली. हे दोन्ही मंत्री कर्नाटकातील बेळगाव येथे जाऊन सीमावादावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (एमईएस) कार्यकर्त्यांची भेट घेणार होते. मात्र, ऐन वेळी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगावला जाण्याचा दौरा रद्द केला. तर, दुसरीकडे या सीमाभागातील गावांमध्ये तसेच बेळगावात मराठी तरुणांवर सातत्याने हल्ले होऊ लागले आहेत. या सीमावादाच्या प्रकरणात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील उडी घेतली असून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांना खळखट्याचा इशारा दिला आहे. (Raj Thackeray's warning to Karnataka Chief Minister on border issue)

MNS President Raj Thackeray has written a letter to the Chief Minister of Karnataka and has warned
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र लिहून कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांना खळखट्याचा इशारा दिला आहे

इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? : आपल्या पत्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले की, मी मध्यंतरी बोललो तसे, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालत आहे, हे तर उघड दिसत आहे, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवा.

निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय : हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचे उत्तर पण तितकेच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जात आहे. महाराष्ट्राला नाहक छळले जात आहे. माझे मराठी बांधवांनाही हे सांगणे असेल की, त्यांना जे हव आहे ते नाही द्यायचे आपल्याला जे हव आहे तेच आपण करायचे.

महाराष्ट्राकडे येणारी बोटे पिरगळली जातील : अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जात आहे. हे प्रकरण साधंसोपे नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटे पिरगळली जातील हे बघावे. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावे.

आव्हान स्वीकारायला मनसे तयार : मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे, आज इथल्या अनेकांची कुलदैवत कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवत महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचे हित आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.