ETV Bharat / state

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मुंबईतील डॉक्टर संपावर

पश्चिम बंगाल सहाय्यक डॉक्टरला झालेल्या मारहाणीत डॉक्टर गंभीररित्या जखमी झाला होता. या घटनेचा मुंबईतील सायन, जे जे व नायर रुग्णालयातील सहाय्यक डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करत निषेध नोंदवला आहे.

मुंबईतील डॉक्टरांचे आंदोलन
author img

By

Published : Jun 14, 2019, 12:00 PM IST

Updated : Jun 14, 2019, 1:55 PM IST

मुंबई - पश्चिम बंगाल येथे एका सहाय्यक डॉक्टरला मारहाण झाली होती. यासंदर्भात मारहाण करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी करत मुंबईतील सायन, जे. जे. व नायर रुग्णालयातील सहाय्यक डॉक्टरांनी काम बंद आंदोलन करून घटनेचा निषेध केला आहे. यामुळे रुग्णांचे काही प्रमाणात हाल होताना दिसत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मुंबईतील डॉक्टर संपावर

पश्चिम बंगालमधील सरकारी रूग्णालयात डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली होती. १० जून रोजी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. या मारहाणीत डॉक्टर गंभीररित्या जखमी झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ तेथील डॉक्टरांनी संप पुकारला होता. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डॉक्टरांना कामावर रुजू व्हा. अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा दिला. त्यांच्या इशाऱ्यानंतरही डॉक्टरांनी संप सुरुच ठेवला. त्या संपाला दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता महाराष्ट्रातील डॉक्टरांनी एक दिवसाचा बंद पुकारुन या आंदोलनाला समर्थन दिला आहे.

मुंबईतील नायर रुग्णालयात निवासी आणि शिकाऊ डॉक्टरांनी स्ट्रीट अॅक्ट सादर करत या घटनेचा निषेध केला आहे. यावेळी सर्व डॉक्टरांनी घटनेच्या निषेधार्थ काळे कपडे घातले. जर सरकारने डॉक्टर्सच्या सुरक्षेविषयी दाद दिली नाही तर पुढे मोठे आंदोलन उभारू, असे डॉक्टर्सकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, आज मुंबई, दिल्लीसह देशाच्या विविध भागांत सकाळपासूनच पश्चिम बंगालमधील घटनेचा परिणाम जाणवत असून रुग्णांची गैरसोय होत आहे. कुठे ओपीडी सेवा कोलमडली आहे. राज्याच्या सर्वच रुग्णालयांमधील डॉक्टर या आंदोलनाचा निषेध करत आहेत. परंतु, मुंबईतील नायरच्या डॉक्टर्सनी आप्तकालीन व्यवस्था सुरु ठेवत हा संप पुकारला आहे.

Intro:पश्चिम बंगाल येथील डॉक्टरला मारहाणीच्या निषेधार्थ मुंबईतील असिस्टंट डॉक्टरांचे आंदोलन

पश्चिम बंगाल येथे एका असिस्टंट डॉक्टरला मारहाण झाली यामध्ये हा असिस्टंट डॉक्टर गंभीर जखमी झालेला असून डॉक्टर हा माणूस आहे. देव नाही हे सांगत मुंबईतील सायन, जेजे,नायर रुग्णालयात असिस्टंट डॉक्टर यांनी वेस्ट बंगाल येथील डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेध करत.मारहाण करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी काम बंद ठेवत निषेध संप केले आहे.यामुळे काही प्रमाणात रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत.

Body:मुंबईतील नावाजलेल्या सायन, जेजे व नायर रुग्णालयातील असिस्टंट डॉक्टर वेस्ट बंगाल येथील डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या विरोधात रुग्णालयातील आपत्कालीन काम चालू ठेवत, रुग्णालयाबाहेर वेस्ट बंगाल येथील घटनेचा निषेध करत आहेत. आणि मागणी करत आहेत की डॉक्टरांना असेच किती दिवस मारहाण होईल ते देखील माणूस आहे. त्यामुळे आम्हालाही तुमच्यासारखा समजावं आमच्याकडून जेवढे प्रयत्न होत आहेत तेवढे आम्ही करतो. त्यामुळे आम्हाला अपराधी करून मारहाण करू नये. जर अशी मारहाण होत असेल तर सरकारने यावर मोठे पाऊल उचलले पाहिजे व डॉक्टरांना संरक्षण देऊ केले पाहिजे अशी मागणी हे संपावर गेलेले डॉक्टर करत आहेत

Conclusion:ग
Last Updated : Jun 14, 2019, 1:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.