ETV Bharat / state

"कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर आणि कर्मचारी जणू युद्धातील आघाडीचे सैनिक"

कोरोनाला हरविण्यासाठी आपली लढाई अशीच सुरू ठेवू या. ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश आपण सर्वसामान्यांना दिला आहे. आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्ला देतानाच आपल्या काही सूचना असतील तर माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा, असे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या पत्रात केले आहे.

corona mumbai
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Apr 1, 2020, 3:52 PM IST

मुंबई- राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्राद्वारे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले आहे. कोरोनाशी लढणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना आरोग्यमंत्र्यांनी युद्धातील आघाडीवरचे सैनिक अशी उपमा दिली आहे. जिवाची बाजी लावून न थकता कोरोना निर्मुलनाचे काम केले जात असल्याबद्दल आरोग्यमंत्र्यांनी या सर्वांना मानाचा मुजरा करत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

corona mumbai
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लिहिलेले पत्र

कोरोनाने जगभरात थैमान घातले असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा आपल्या राज्यात शिरकाव झाला आणि तेव्हापासून आपण मंडळी जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहेत. तुमच्या या कार्याला सलाम. तुमच्या तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीमुळे आतापर्यंत राज्यातील ३९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल आपण सर्वांचे अभिनंदन व आभार असल्याचे राजेश टोपे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

कोरोनाचा शिरकाव सुरू झाल्यापासून आपण सर्व डॉक्टर आणि कर्मचारी सर्वप्रथम त्याला सामोरे गेले आहात. सर्वात आधी तुम्ही मंडळींनी या युद्धाला सामोरे जाण्यासाठी नेतृत्व केले. त्याचप्रमाणे एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक झोकून देऊन नेटाने बाजी लढवत असतो, तसे तुम्ही आतापर्यंत धीराने कोरोनाविरुद्ध लढत आहात. समाजाच्या सेवेसाठी हे अतुलनीय शौर्य तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून न थकता दाखवत आहात. हे अभिनंदनीय आहे. तुम्ही दाखवत असलेल्या धीरामुळे रुग्णांना तर मानसिक बळ मिळतेच, परंतु आम्हालाही त्यामुळे काम करण्याचे पाठबळ व प्रोत्साहन मिळत आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

त्याचबरोबर, समस्त देशवासी आपापल्या घरात कुटुंबीयांसमवेत असताना आपण मात्र कर्तव्य भावनेतून कुटुंबापासून, आप्तस्वकीयांपासून दूर जात सेवाभाव जपत आहात. खरे तर आपले कौतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत. पुन्हा मी आपण सर्वांना त्रिवार मुजरा करतो. कोरोनाला हरविण्यासाठी आपली लढाई अशीच सुरू ठेवू या. ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश आपण सर्वसामान्यांना दिला आहे. आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्ला देतानाच आपल्या काही सूचना असतील तर माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा, असे आवाहनही शेवटी आरोग्यमंत्र्यांनी पत्रात केले आहे.

हेही वाचा- भाजपाच्या आमदार, खासदार, नगरसेवकांचा मदतनिधी पक्षाच्या आपदा निधीत कशासाठी? - सचिन सावंत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.