मुंबई - कोरोना विषाणूचा संसर्ग संपूर्ण जगामध्ये वेगाने पसरत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईसारख्या शहरामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, उच्च न्यायालय परिसर व इतर जास्त रहदारीच्या ठिकाणावर नि:शुल्क हँड सॅनिटायझर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज विधानभवनाबाहेर दिली. जिल्हा नियोजनामधून यासाठीच्या निधीची तरतुद केली जाईल, असेही ते म्हणाले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत मोफत हँड सॅनिटायझरचे वाटप - Distribution of free hand sanitizer
मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज विधानभवनाबाहेर सॅनिटायझर वाटून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत मोफत हँड सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले.
अस्लम शेख