ETV Bharat / state

पेंग्विनवर होणाऱ्या खर्चामुळे विरोधी पक्ष अन् सत्ताधारी आमने-सामने

मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील राणीबागेत म्हणजेच वीरमाता जिजामाता भोसले प्राणिसंग्रहालयात 2017 मध्ये दक्षिण कोरियामधून हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. पेंग्विनवर होणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चामुळे सध्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Sep 6, 2021, 3:36 PM IST

मुंबई - मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील राणीबागेत म्हणजेच वीरमाता जिजामाता भोसले प्राणिसंग्रहालयात 2017 मध्ये दक्षिण कोरियामधून हंबोल्ड पेंग्विन आणण्यात आले. पेंग्विनवर होणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चामुळे सध्या विरोधी पक्ष आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. मात्र, पेंग्विनवरून होणारा वाद काही नवा नाही. यापूर्वी पेंग्विन आणल्यापासून एका पेंग्विनचा झालेला मृत्यू, पेंग्विन आणण्यासाठी काळ्या यादीतील कंत्राटदाराला देण्यात आलेले कंत्राट, पेंग्विनच्या पिलाचा झालेला मृत्यू, पेंग्विन पाहण्यासाठी वसूल करण्यात येणारे शुल्क आदी वाद निर्माण झाले होते. यामुळे राणीबागेत पेंग्विन आणल्यापासून वादग्रस्त ठरले आहेत.

बोलताना विरोधी पक्ष नेते व महापौर

काळ्या यादीतील कंत्राटदार

मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील राणीबागेत 2017 मध्ये दक्षिण कोरियातून हम्बोल्ड पेंग्विन आणण्यात आले. त्यासाठी विशेष वातानाकुलित कक्ष उभारण्यात आला आहे. पेंग्विन खरेदीसाठी आणि या कक्षासाठी एकूण 25 कोटींचा खर्च झाला होता. यासाठी हायवे कन्स्ट्रक्शन या कंपनीला काम देण्यात आले होते. पालिकेने या कंपनीला काळ्या यादीत टाकले होते. ही कंपनी कन्स्ट्रक्शनचे काम करत असताना त्यांना पेंग्विन आणण्याचे काम का देण्यात आले, असा प्रश्न तत्कालीन विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी उपस्थित केला होता.

पेंग्विन आणि पिलाचा मृत्यू

दक्षिण कोरियामधून आणण्यात आलेले पेंग्विन मुंबईमधील वातावरणात जगणार नाहीत. त्यांना हे वातावरण मानवणार नाही, असा युक्तिवाद 2017 मध्ये करण्यात येत होता. याच वेळी मुंबईत आणलेल्या 8 पेंग्विनपैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला. त्यानंतर मोल्ट आणि फ्लिपर या पेंग्विनने ऑगस्ट, 2018 मध्ये एका पिलाला जन्म दिला होता. मात्र, हे पिल्लू आठच दिवसात मृत्यू पावले. यावरून पालिका प्रशासन आणि सत्ताधार्यांवर टीका झाली होती.

पेंग्विन पाहण्यासाठी शुल्क

राणीबाग व पेंग्विन पाहण्यासाठी येणाऱ्या लहान मुलाला 2 रुपये तर प्रौढ व्यक्तीला 5 रुपये इतके शुल्क होते. राणी बागेतील पेंग्विन दालनाचे महिन्याला वीज बील दहा लाख रुपयांहून अधिक येत असून त्याच्या देखभालीसाठीही लाखो रुपयांचा खर्च होत असल्याचा दावा करत प्रशासनाने राणीच्या बागेतील प्रवेश शुल्क पाच रुपयांवरुन 100 रुपये करण्याचा प्रस्ताव तयार केला. सत्ताधारी शिवसेनेचा महत्वाकांक्षी असलेला प्रकल्प म्हणून याकडे पहिले जात असल्याने शिवसेनेने या दरवाढीला पाठिंबा दिला. बाजार व उद्यान समितीमध्ये या शुल्कवाढीच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली. मात्र, स्थायी समितीत भाजपा आणि काँग्रेसने याला प्रखर विरोध केला. या विरोधामुळे प्रस्ताव रद्द होण्याची भीती असल्याने शिवसेनेने प्रौढ व्यक्तीसाठी घेण्यात येणारे 100 रुपये शुल्क 50 रुपये केले होते. सध्या 12 वर्षांवरील व्यक्तींसाठी 50 रुपये, तीन ते 12 वयोगटांतील मुलांसाठी 25 रुपये, दोन प्रौढ व तीन ते 12 वर्षांपर्यंतची दोन मुले अशा कुटुंबासाठी 100 रुपये तर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी निशुल्क पेंग्विन पाहता येतात.

पेंग्विनवर कोट्यवधीचा खर्च

मुंबई महापालिकेच्या भायखळा येथील राणीबागेत 2017 मध्ये दक्षिण कोरियातून हम्बोल्ट पेंग्विन आणण्यात आले. त्यासाठी विशेष वातानाकुलित कक्ष उभारण्यात आला आहे. पेंग्विन खरेदीसाठी आणि या कक्षासाठी एकूण 25 कोटींचा खर्च झाला होता. त्यानंतर 3 वर्षांच्या देखभालीसाठी 11 कोटी खर्च झाले. त्यानंतर आता पुन्हा पुढच्या तीन वर्षांसाठी 15 कोटी खर्च अपेक्षीत आहे. निविदा काढलेली रक्कम पेंग्विन प्रदर्शनाची देखभाल आणि वातानुकुलन सुविधा, लाइफ सपोर्ट आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा आणि पेंग्विनसाठी मासे, अन्न पुरवण्यासाठी खर्च केली जाईल. पेंग्विनच्या दररोजच्या देखभालीसाठी विशेष पशुवैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टर्स नेमलेले आहेत. दररोज पेंग्विनसाठी विशेष खाद्य, विशेष प्रकारचे मासे आणि इतर सप्लीमेंटस् दिल्या जातात. गेल्या तीन वर्षात एक नवजात पिलू पेंग्विन आणि एका नर पेंग्विनचा मृत्यू झाला आहे.

टेंडर रद्द करा

पेंग्विन आहेत ते कंत्राटदारासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. कंत्राटदाराला फायदा व्हायला पाहिजे यासाठी टेंडर काढण्यात आले आहे. राणीबागेतील आपले डॉक्टर आणि कर्मचारी परदेशातून आणल्या जाणाऱ्या पक्षी आणि प्राण्यांना कसे सांभाळायचे आहे हे गेल्या तीन वर्षांत शिकले आहेत. कोरोना काळात पालिकेची आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे. अशावेळी 15 कोटींचे टेंडर कशासाठी काढता असा प्रश्न पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे. पेंग्विनच्या देखभालीसाठी काढण्यात आलेलं टेंडर रद्द करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. राणीबागेत संचालक आहेत त्या ठिकाणी परदेशातून संचालक मागवावेत असा टोला रवी राजा यांनी लगावला आहे.

खर्चाबाबत तोडगा काढू

शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख व सध्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पेंग्विन आणण्यात आले. त्यासाठी वातावरण निर्मिती करण्यात आली. त्यानंतर एका पेंग्विनचा मृत्यू झाला त्यावेळीही राजकारण करण्यात आले. पेंग्विनमुळे पालिकेचे उत्पन्न वाढत असून खर्चही वाढत आहे. पेंग्विनमुळे मुंबईची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पेंग्विनवर मोठ्या प्रमाणात खर्च होतोय असे विरोधकांना वाटत असेल तर त्यावर नक्की तोडगा काढला जाईल मात्र पेंग्विनवर तडजोड होणार नाही असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

सुधारीत निविदा काय आहे..?

पुढील 3 वर्षांसाठी पालिका 15 कोटी रुपये एकूण 7 पेंग्विन वर खर्च केला जाणार आहे. त्यासाठी पालिकेने 15 कोटींची सुधारित निविदा काढली असून प्रत्येक वर्षी 5 कोटी रुपये खर्च केले जाणार. 2018 मध्ये तीन वर्षाचा देखभालीचा करार हा 11 कोटीचा करण्यात आला होता. तो आता संपत आहे.

पेंग्विन्सच्या आलिशान लाईफस्टाईलवर कोट्यवधींचा खर्च

  • एका दिवसाचा एका पेंग्विनवरचा खर्च - 20 हजार
  • एका दिवसाचा 7 पेंग्विनवरचा मिळून खर्च - दीड लाख
  • एका महिन्याचा एका पेंग्विनसाठी खर्च - 6 लाख
  • एका महिन्याचा 7 पेंग्विनचा खर्च - 42 लाख
  • एका वर्षाचा एका पेंग्विनसाठीचा खर्च -71लाख
  • एका वर्षाचा 7 पेंग्विनवरचा खर्च - 5 कोटी
  • एकूण 3 वर्षांसाठी 7 पेंग्विनवरचा खर्च 15 कोटी

हेही वाचा - ..तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल, उत्सव नंतरही साजरे करू, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.