मुंबई - मालाड पूर्वेत व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. या दोन चोरांकडून पोलिसांनी तब्बल 13 लाख रुपयांची रोकड आणि एक स्पोर्ट्स बाइक हस्तगत केली आहे. मलाड पूर्वेत पश्चिम द्रुतगती महामार्गाला लागून टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीजवळ उभ्या असलेल्या अॅक्टिवा गाडीच्या डिक्कीतून २१ लाख रुपये घेऊन आरोपी फरार झाले होते.
काय आहे घटना -
एक व्यापारी अॅक्टिवा बाईक टाईम्स ऑफ इंडियाच्या इमारतीजवळ ठेवली होती. त्याच वेळी हे दोघे चोर एक स्पोर्ट बाईकवर बसून आलेत आणि व्यापाऱ्याशी हुज्जत घातली. याच दरम्यान त्या व्यापाराच्या गाडीची चावी घेऊन डिक्कीमधून ते 21 लाख रुपये घेऊन फरार झाले. या चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दिंडोशी पोलिसांनी या दोन्ही आरोपींना गुजरातमधून अटक केली आहे.
अशी करायचे चोरी -
हे दोन्ही आरोपी बाईकने गुजरातवरून मुंबईत यायचे. मालाड भागातील व्यापाऱ्यांवर नजर ठेवून त्यांच्याकडील रोकड लुटायचे. या दोघांची हीच मोडस ऑपरेंडी असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. दोघेही सराईत गुन्हेगार असून ते गुजरातच्या छारानगर आणि कुबेर नगरचे रहिवासी आहेत. विशाल तमंचे (४२) आणि अमित तमंचे (२५) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून १३ लाखांची रक्कम जप्त करण्यात आली असून इतर गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.
हेही वाचा - स्कॉर्पिओत धमकीचे पत्र ठेवायला विसरला होता सचिन वाझे