मुंबई : भारतात दिल्लीच्या क्षेत्रातील हवेची गुणवत्ता घसरते त्याबाबतचे राजकीय वाद होतात. उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील त्याबाबत याचिका दाखल होतात. मात्र दिल्लीच्या तुलनेमध्ये मुंबईची देखील हवेची गुणवत्ता खराब असल्याचे स्पष्ट झाले ( Air Quality Index Fell ) आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता ज्याला एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतो तो मंगळवारी 262 आकड्यापर्यंत गेला. तुलनेने दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स 209 इतकाच म्हणजे मुंबई पेक्षा कमी खराब होता आणि दिल्ली व मुंबईची तुलना केल्यास दिल्लीपेक्षा आज मुंबईची हवेची गुणवत्ता प्रचंड खालावली ( Mumbai Air Quality Worse Than Delhi ) असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एअर क्वालिटी इंडेक्स खाली घसरला : मुंबईतील काही ठिकाणची हवेची गुणवत्ता उदाहरणार्थ अंधेरी 228 तर भांडुप 239 वांद्रे कुर्ला संकुल या भागामध्ये 242 कुलाबा या क्षेत्रात 259 आणि चेंबूर उपनगरात 286 बोरिवली उपनगरात ३०३ आणि माझगाव बंदराच्या परिसरात 316 आणि मालाड हे सर्वात जास्त म्हणजे 320 इतका एअर क्वालिटी इंडेक्स खाली घसरला ( Mumbai Air Quality Declined) त्यामुळे मुंबईची एकूण सर्वसाधारण हवेची गुणवत्ता घसरली. फक्त वरळी 156 आणि नवी मुंबई 169 वगळता बाकी सर्व मुंबईभर हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झालेली आहे. हवेची गुणवत्ता घसरणार आहे याबाबत पर्यावरणाचे अभ्यासक वनशक्तीचे प्रमुख स्टालीन दयानंद यांनी इशारा दिला होता हा इशारा एका आठवड्यापूर्वी दिला होता. आणि मुंबईची हवेची गुणवत्ता घसरेल हा अंदाज अनुभवाच्या आधारे वर्तवला होता.
हवेची गुणवत्ता घसरण्याचे कारण काय : यासंदर्भात स्टालीन दयानंद यांनी हवेची गुणवत्ता घसरण्यासंदर्भातलं पर्यावरणामध्ये घडणाऱ्या घडामोडींचे विश्लेषण केले. ते म्हणतात," मुंबई महानगर क्षेत्र हे अत्यंत मोठे आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर ठाण्याचा भाग रायगड रत्नागिरी असा मोठा भाग मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये येतो. त्यापैकी केवळ आपण मुंबई आणि मुंबई उपनगर याचा अभ्यास केला. तर सर्व प्रकारच्या मेट्रो रेल्वेचे मार्ग टाकण्याचे काम त्यासाठी खड्डे खोदण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्याशिवाय कोरोना महामारीच्या काळात बांधकाम क्षेत्र थांबलो होता. आता वेगाने ते सुरू झालेले. नवीन इमारती बांधण्यासाठी खड्डे खोदणे सुरू आहे. तसेच महापालिकेचे वेगवेगळ्या प्राधिकरणाचे छोटे मोठे काम त्यासाठी रस्ते खोदणे देखील सुरू आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महापालिकेचे अज्ञान आहे की, दर चार सहा महिन्यात महापालिकेच्या हद्दीतील झाड त्यांची छाटणी करताना अज्ञानामुळे खालच्या फांद्या ते संपूर्ण तोडून टाकतात. मात्र खालच्या फांद्या या कार्बन डाय-ऑक्साइड खेचून घेण्याचे काम करतात. त्या फांद्याच नष्ट झाल्या. त्याच्यामुळे कार्बन डाय-ऑक्साइड आणि बांधकामाची धूळ हे सर्व एकत्र झाल्यामुळे हिवाळ्यामध्ये ही धूळ वरती हवेत जाऊन विरत नाही. त्यामुळे ती वातावरणाच्या खालीच राहते म्हणून आपल्याला प्रचंड त्रास होतो आणि हवेची गुणवत्ता घसरल्याचं लक्षात येते.
याच्यावरचा उपाय काय : पर्यावरण तज्ञ एडवोकेट गिरीश राऊत यांनी सांगितले की," मानवाला बाजूला ठेवून विकास कामाचे धोरण आखणी करतात ते ताबडतोब बंद करायला पाहिजे. सरकार जे प्रकल्प राबवतात त्यासाठी खड्डे रस्ते खोदतात त्याची धूळ उडते ती धूळ उडू नये म्हणून त्यावर नियमानुसार ठराविक काळाने पाणी मारलं पाहिजे .तसंच शहरांमध्ये दुतर्फा झाडांची संख्या तिपटीने वाढवली पाहिजे. महापालिकेने झाड छाटताना खालच्या फांद्या अशा पद्धतीने कापाव्या की त्या संपूर्ण कापल्या जाणार नाहीत म्हणजेच कार्बन डाय-ऑक्साइड झाडांचे फांद्या खेचून घेतात.