मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी वंचित बहुजन आघाडीला महाआघाडीसोबत येण्याचे आवाहन केले आहे. विरोधी पक्षांनी मुंबईत आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत मुंडे बोलत होते.
मुंडे म्हणाले, की वंचित बहुजन आघाडीने मतांचे विभाजन होऊन भाजप-शिवसेनेला मदत होईल, असे न करता त्यांनी महाआघाडीसोबत यावे. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचीही हीच भूमिका आहे. आम्ही याबाबत त्यांच्याशी चर्चा करत असून अजूनही ही चर्चा सुरूच आहे.
यावेळी मुंडे सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्ष बहिष्कार घालत असल्याची माहिती देताना सांगितले, की देशाचे ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले आहे. त्यामुळे देशभर संतापाचे आणि दुःखाचे वातावरण असताना सरकारने आयोजिक केलेल्या चहापानाचे निमंत्रण स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.