ETV Bharat / state

पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी - लालबागच्या राजा

आज सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. त्यामुळे भाविक-भक्त बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी देखील भाविकांनी एकच गर्दी केली. त्यामुळे परिसर फुलून निघाला.

लालबागचा राजा
author img

By

Published : Sep 2, 2019, 8:48 AM IST

Updated : Sep 2, 2019, 1:12 PM IST

मुंबई - आज सोमवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी रात्रीपासूनच गर्दी केली आहे. आज सकाळी बाप्पाच्या आरतीनंतर भाविकांनी दर्शन घ्यायला सुरुवात केली.

लालबागच्या राजाच्या दरबारातून अधिक माहिती देताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी

दरवर्षी प्रमाणे यंदाही संपूर्ण भारतात गणेशोत्सवाची लगबग पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येत आहे. यादिवशी केवळ मंदिरातच नाही, तर घरांमध्ये, सार्वजनिक मंडळात गणपती बाप्पांच्या मूर्तींची स्थापना करण्यात येत आहे. आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे. मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भाविक आले आहेत. बाप्पाचे दर्शन घेतानाच गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. दर्शनाला सुरुवात झाल्यानंतर एकच गर्दी उसळली. त्यामुळे परिसर फुलून निघाला होता. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी बाप्पाचे दर्शन करण्यासाठी अनेकजण रात्रापासूनच लालबागमध्ये दाखल झाले होते. पुढील १० दिवस गर्दी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

'असा' साकारला देखावा -

लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाने यंदा भारताची अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो'च्या कार्य कर्तृत्वाला सलाम करणारा देखावा साकारला आहे. भारताने 'चांद्रयान-२'चे यशस्वी प्रक्षेपण केले. त्यामुळे आपल्या शास्त्रज्ञांच्या कार्याचे या देखाव्यामधून कौतुक केले आहे.

नुकतेच इस्रोने अवकाशात सोडलेले 'चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत प्रदक्षिणा घालत आहे. चांद्रयान २ मधून लँडर 'विक्रम' ७ सप्टेंबर २०१९ ला पहाटे चांद्रभूमीवर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अंतराळ क्षेत्रात केलेली प्रगती या देखाव्यात साकारली आहे. त्यामुळे यंदा लालबागचा राजा चांद्रभूमीवर विराजमान झालेला आहे.

भारताच्या 'चांद्रयान २' मोहिमेसोबत भविष्यातील 'गगनयान' या भारतीय अंतराळवीरांना अवकाशात घेऊन जाणाऱ्या मोहिमेसाठीही लालबागचा राजाकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. भारताला सुपर पॉवर बनवण्यासाठी इस्रो ऐतिहासिक कामगिरी करीत आहे. त्यामुळे त्यांच्या या कर्तृत्वाचा गौरव लालबागच्या राजाच्या राजेशाही दरबारात पाहायला मिळणार आहे, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Intro:
पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविक मोठया संख्येने

दरवर्षी प्रमाणे यंदाही संपूर्ण भारतात गणेशोत्सवाची लगबग पहायला मिळत आहे. गणेशोत्सव सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येतोय. आज गणेश चतुर्ती आहे. या दिवशी केवळ मंदिरातच नाही तर, घरांमध्ये, सार्वजनिक मंडळात गणपती बाप्पांच्या मुर्तीची स्थापना करण्यात येत आहे.त्यातच याआज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आहे .मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भाविक आले आहेत. मोठी गर्दी लालबागचा राजाचा दर्शनासाठी दिसत आहे.

बाप्पाचं दर्शन घेतानाच गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. बाप्पाच्या दर्शनासाठी रात्रभर रांगा लागलेल्या असतानाच सकाळी दर्शन सुरू झाल्यानंतर पुन्हा भाविकांची गर्दी उसळल्याने लालबाग परिसर फुलून गेला होता. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी बाप्पाचं दर्शन मिळावं म्हणून कुटुंबकबिल्यासह लोक रात्रीपासूनच लालबागमध्ये दाखल झाले होते. यंदा लालबागच्या राजा अंतराळात आपली दृष्टी ठेऊन आहे असे धारण केलेला देखावा आहे. स्टेजवर मंगळयान 2चा देखावा निर्माण करण्यात आला आहे. विद्यूत रोषणाईमुळे व थ्रीडी फ्रेम्स लाईट्सने हा परिसर फुलून गेला आहे.

ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत आगमन झालेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी गर्दी उसळली आहे. त्यामुळे आगामी अकरा दिवस ही गर्दी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहेBody:.Conclusion:व्।
Last Updated : Sep 2, 2019, 1:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.