नवी मुंबई - मी मुख्यमंत्री नाही. मला ही गोष्ट लोकांनी जाणवूच दिली नाही, असे वक्तव्य विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ते आज (मंगळवारी) नवी मुंबईत मासळी विक्रेत्यांना परवाना वितरणाच्या कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या वक्तव्यामुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नवी मुंबईतील गणेश नाईक व माथाडी नेते नरेंद्र पाटील तुमच्यासारखे नेते माझ्या पाठिशी असल्याने त्यामुळे मला असे वाटते मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. मला एकही दिवस जाणवलं नाही, की मी मुख्यमंत्री नाही. व्यक्ती कोणत्या पदावर आहे ही बाब महत्त्वाची नाही, मात्र तो काय करतो ही गोष्ट महत्त्वाची आहे. एकही दिवस घरात न थांबता मी जनतेची सेवा सलग दोन वर्षे करीत आहे. त्यामुळे मला कधीही जनतेने हे जाणवू दिलेले नाही, की मी मुख्यमंत्री नाही. नवी मुंबईतील बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या नवरात्रोत्सवात गोवर्धनी मातेच्या दर्शनाला देवेंद्र फडणवीस आले होते.
हेही वाचा - मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन