ETV Bharat / state

विष्णू सावरा यांच्या निधनाने भाजपाचा समर्पित कार्यकर्ता हरपला! देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला शोक

author img

By

Published : Dec 10, 2020, 3:27 PM IST

राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या अंत्यविधीसाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Vishnu Savara
Vishnu Savara

मुंबई - भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचे काल(बुधवारी) निधन झाले. त्यांच्या निधनाने भाजपाचा एक सच्चा आणि समर्पित कार्यकर्ता हरपला. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कायम स्मरणात राहील, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.

भाजपा जिल्हाध्यक्ष, आदिवासी आघाडीचे अध्यक्ष, प्रदेश सचिव अशा विविध भूमिकांमधून संघटनात्मक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. निवासी शाळांचे व्यवस्थापन, आदिवासी समाजात शिक्षणाचा प्रसार यासाठीही त्यांनी परिश्रम घेतले. स्पष्टवक्तेपणा आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी आदिवासी कल्याणाच्या अनेक योजना परिणामकारकपणे राबवण्यासाठी पुढाकार घेतला. 30 वर्ष त्यांनी विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

माजी आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा (वय 70) यांना लिव्हर सोरायसिसच्या उपचारांसाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केलेले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्या पार्थिवावर वाडा येथील सिध्देश्वर घाट येथे दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार झाले. या अंत्यविधीसाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.