ETV Bharat / state

Sanjay Shirsat On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी आता केंद्रात राज्याचं नेतृत्व करावं - संजय शिरसाटांनी लावली कळ - Sanjay Shirsat Criticism Sanjay Raut

Sanjay Shirsat On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी आता केंद्रात जाऊन राज्याचं नेतृत्व करावं आणि एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यात मुख्यमंत्रीपदाची धुरा पाच वर्षांसाठी सांभाळावी असं मत संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी व्यक्त केलं आहे. संजय राऊत यांच्याबद्दलही त्यांनी सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Shirsat Criticism Sanjay Raut
संजय शिरसाटांचे मत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 7:57 PM IST

मुंबई Sanjay Shirsat On Devendra Fadnavis: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यावर टीका केली. या टीकेला प्रतिउत्तर देताना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांना नेहमी घाण टीका करायची सवय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आतापर्यंत कोणीही अशी टीका केलेली नाही. राऊत हे नाडी आणि बेल्टपर्यंत आलेले आहेत. संजय राऊत म्हणजे काय आहेत, याचाही समाचार एका म्हणीचा वापर करुन संजय शिरसाट यांनी घेतला. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलही शिरसाट यांनी मत व्यक्त केलंय.

फडणवीस यांनी केंद्रात नेतृत्व करावं : संजय शिरसाट यांनी माध्यमांच्याशी बोलताना पक्षवाढीसंदर्भात इतर नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा संदर्भ दिला. ते म्हणाले की, प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेता आपल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी पाहू इच्छितो. 'अजित पवार यांच्याबाबतही तसंच आहे. काही लोकं अजित पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावतात. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही तसंच आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत स्पष्ट केलं. ते म्हणतात त्यात काही गैर नाही. आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत.' यावेळी बोलताना शिससाट यांनी त्यांचीही इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे हेच पुढे मुख्यमंत्री राहावेत आणि देवेंद्र फडणवीस इतकं चांगलं काम करतात की त्यांनी केंद्रात नेतृत्व करावं.

राणेंचीही राऊत यांच्यावर सडकून टीका : संजय राऊत यांच्या या टीकेवर प्रत्युत्तर देताना भाजपा आमदार नितेश राणे यांनी राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे. संजय राऊत हे नेमके कोणाचे आहेत हे त्यांना तरी ठाऊक आहे का, त्यांचा मदारी मातोश्री की सिल्वर ओक हे त्यांनी स्पष्ट करावं मगच टीका करावी, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

प्रसाद लाड यांची संजय राऊतांवर टीका : यापूर्वी प्रसाद लाड यांनी मार्च 2023 मध्ये संजय राऊतांवर टीका केली होती. बुकी अनिल जयसिंघानिया आणि त्यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानिया यांचे लाच प्रकरण गाजत असताना यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झालेले होते. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर टीका केली होती. याबाबत भाजपा नेते आमदार प्रसाद लाड यांनी खासदार संजय राऊत यांना इशारा देत, 'आम्ही जर संजय राऊत यांच्या कुटुंबाबद्दल बोललो तर त्यांना चेहरा दाखवायला जागा राहणार नाही', असं सांगत राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांची माफी मागावी असे सांगितले होते.

हेही वाचा:

  1. Vijay Wadettiwar : भ्रष्टाचारी मंत्र्यांवर गोमूत्र शिंपडले, वॉशिंग मशीनमध्ये धुतले, पण डाग जरा जिद्दी आहेत - विजय वडेट्टीवार
  2. Manoj Jarange On OBC : 'ओबीसीमध्ये यायचं असेल तर...', नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील, वाचा सविस्तर
  3. Sanjay Raut on State Government : या सरकारच्या चड्डीच्या नाड्या दिल्लीत म्हणून मुख्यमंत्री नेहमी दिल्लीला जातात; राऊतांची राज्य सरकारवर जळजळीत टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.