ETV Bharat / state

सरकारकडे उपाय उरला नाही म्हणून संजय राठोड यांचा राजीनामा - देवेंद्र फडणवीस - sanjay rathod resign form ministry mumbai

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आलेले शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे, असे संजय राठोड यांनी जाहीर केले आहे.

Devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Feb 28, 2021, 7:10 PM IST

Updated : Feb 28, 2021, 7:55 PM IST

मुंबई - सरकारकडे उपाय उरला नाही म्हणून संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच पूजा चव्हाण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न जे पोलीस करीत आहेत, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. तसेच आता तत्काळ एफआयआर नोंदविला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना.

संजय राठोड यांचा राजीनामा -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आलेले शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे, असे संजय राठोड यांनी जाहीर केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आमच्या समाजाच्या तरूणीच्या मृत्यूवरून विरोधी पक्षाने मला, माझ्या समाजाची बदनामी केली, असेही ते म्हणाले. सत्य बाहेर येऊ द्या, ही माझी भूमिका आहे. विरोधकांमुळे माझ्या वैयक्तिक जीवनावर जो परिणाम होत आहे, त्यामुळे मी पदावरून दूर होत आहे. माझे राजकारण संपवण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोपही त्यांनी विरोधकांवर केला. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. मी राजीनामा देऊन बाहेर आलो आहे. राजीनामा देताना अनिल देसाई आणि अनिल परबही सोबत होते, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून सरकारवर दबाव टाकण्यात येत होता. भाजपच्या वतीने राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण -

स्पोकन इंग्लिशच्या क्लासकरता गेलेल्या तरुणीची पुण्यात आत्महत्या

पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेलेल्या परळीच्या २२ वर्षीय तरुणीने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना महम्मदवाडी येथे उघडकीस आली. ही घटना रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पूजा चव्हाण असे मृत तरुणीचे नाव आहे.

वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी आली होती. पूजा लहू चव्हाण ही परळी शहरात हेवनपार्क लेन नंबर 10 मधील रहिवाशी होती. तिचे मूळ गाव परळी वैजनाथ हे होते.

हेही वाचा - वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला राजीनामा

Last Updated : Feb 28, 2021, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.