ETV Bharat / state

कांजूरमार्ग येथील पर्यावरणाची हानी पर्यावरणप्रेमींना मान्य आहे का? फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका - metro car shed news

महाविकास आघाडी सरकारनेच स्थापन केलेल्या अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या नेतृत्त्वातील समितीचा अहवाल उघड करून यातील विरोधाभास स्पष्ट दिसून येत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे हा ‘नो-कॉस्ट’ नाही, तर ‘नो-मेट्रो’ प्रस्ताव! आहे, असेही फडणवीस म्हणाले. आपल्या अधिकृत टि्वटर अकाउंटवरून फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या अहवालाचे फोटोही टि्वट केले आहेत.

Cm
Cm
author img

By

Published : Oct 14, 2020, 6:12 PM IST

मुंबई - मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आरेची जागा हा एकमात्र व्यवहार्य पर्याय होता. आर्थिकदृष्ट्यासुद्धा तो किफायतशीर होता आणि पर्यावरणीय परिणाम कमीत कमी होईल, हा विचार केल्याने तो अधिक शाश्वत पर्याय होता. मेट्रो - 3 आणि मेट्रो - 6 या दोन मार्गिकांना एकात्मिक करून कांजुरमार्ग येथे कारशेड प्रस्तावित करण्याची मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांची संकल्पना त्यांनीच स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने यापूर्वीच नाकारली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हा मुंबईकरांचा धडधडीत विश्वासघात असल्याची टीकाही यावेळी फडणवीस यांनी केली. महाविकास आघाडी सरकारनेच स्थापन केलेल्या अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या नेतृत्त्वातील समितीचा अहवाल उघड करून यातील विरोधाभास स्पष्ट दिसून येत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे हा ‘नो-कॉस्ट’ नाही, तर ‘नो-मेट्रो’ प्रस्ताव! आहे, असेही फडणवीस म्हणाले. आपल्या अधिकृत टि्वटर अकाउंटवरून फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या अहवालाचे फोटोही टि्वट केले आहेत.

‘आरे येथे टनेलची 76 टक्के कामे पूर्ण झाली, पण कार डेपो 4-5 वर्ष असणार नाही. या प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेची ही अखेर असणार. वाढीव किंमतीचा भार शेवटी ग्राहकांच्या खिशातूनच जाणार आहे. पर्यावरणासाठी संघर्ष करणार्‍यांचा मी सन्मानच करतो. पण, आरे कारशेडची जागा ही कोणताच अन्य पर्याय शिल्लक न राहिल्याने निश्चित करण्यात आली होती. पण, आता हेच पर्यावरणवादी मिठागाराच्या जागेवर, कांदळवन असलेल्या जागेवर, वन संरक्षित जागेवर कारशेडचे समर्थन करणार का? असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नव्हे तर 1 ऑक्टोबर 2020 रोजी मुंबई जिल्हाधिकार्‍यांनी कांजुरमार्गची जागा हस्तांतरित करताना ही अट स्पष्टपणे नमूद केली आहे की, या जागेशी संबंधित दावे प्रलंबित असल्यास त्यावरील खर्च हा ‘एमएमआरडीए’लाच सोसावा लागणार, ही माहिती आपण पुराव्यानिशी देत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या अहवालातील दावे उघड करून फडणवीस यांनी कारशेडची जागा बदलवणे कसे नुकसानदायी ठरणार’, याबाबत माहिती दिली.

राज्य सरकारवर प्रचंड आर्थिक भार -

त्रिपक्षीय करारानुसार, प्रकल्पाच्या कार्यकक्षेत, कालावधीत होणारे बदल किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे होणारा विलंब याचा संपूर्ण आर्थिक भार हा राज्य सरकारलाच उचलावा लागणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. मेट्रो-6च्या आरे ते कांजुरमार्ग या भागात विविध मार्गावरील मिश्र रेल्वे वाहतुकीमुळे मेट्रो-6 च्या कार्यान्वयनात तर प्रचंड गुंतागुंत निर्माण होईलच तसेच याचा मेट्रो-3 वरही परिणाम होईल आणि या दोन्ही मेट्रोंच्या कार्यान्वयीन क्षमतेवर परिणाम होईल, शिवाय नुकसानही वाढेल, असेही फडणवीस म्हणाले.

कारडेपो कांजुरमार्ग येथे स्थानांतरित करून मेट्रो-3चे प्रश्न तर सुटणार नाहीच, शिवाय मेट्रो 3 आणि 6 अशा दोन्ही मेट्रोच्या फेर्‍या मोठ्या प्रमाणात प्रभावित होणार आहेत. करारात कित्येक तरी बदल करावे लागणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. शिवाय, कांजुरमार्ग येथील जमिनीची सद्यस्थिती पाहता कंत्राट दिल्यानंतर, त्या जागेचे स्थिरीकरण, इत्यादीसाठी 2 वर्षांचा कालावधी लागणार असल्याचेही ते म्हणाले.

मुंबईकरांच्या हालअपेष्टांमध्ये वाढ -

कारशेडसाठी जागेच्या उपलब्धतेनंतर मेट्रो कार्यान्वयासाठी साडेचार वर्ष लागणार, जेव्हा की, ही मेट्रो डिसेंबर 2021 मध्ये कार्यान्वित होणार होती. कारशेडसाठी कांजुरमार्ग येथील जागा निश्चित केल्यास विविध अडचणी जसे, मेट्रो-6च्या प्रस्तावित मार्गातील बदल याचाही विचार करावा लागेल. तसेच, चालू कामे तत्काळ थांबवून प्रकल्पाचा संपूर्ण आढावा घेऊन आराखडा, बांधकाम नव्याने करावे लागणार असल्याचेही फडणवीस म्हणाले. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दि. 17 जानेवारी 2020 च्या स्थळपाहणी अहवालावरून असे लक्षात येते की, कांजुरमार्ग येथील प्रस्तावित जागा अद्यापही विवादित असल्याचेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.