ETV Bharat / state

Devendra Fadnavis : संपूर्ण वीज बिल माफ करा असे आपण कधीही म्हटले नाही-देवेंद्र फडणवीसाचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर - Devendra Fadnavis counterattack

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला ( Accusations on farmers electricity bills ) आहे. कोविड काळामध्ये ज्याप्रमाणे मध्य प्रदेशने तेथील शेतकऱ्यांचे विज बिल माफ केले. तोच पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्यात यावा असे आपण म्हटले होते. असे त्यांनी म्हयले आहे.

fadanvis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Nov 28, 2022, 12:28 PM IST

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या सभेत एक ऑडिओ क्लिप दाखवून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Audio clip ) यांनी सत्तेत असताना केलेलं वक्तव्य सत्तेत आल्यानंतर कसे बदलले हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला ( Accusations on farmers electricity bills ) आहे.

उद्धव ठाकरेंवर पलटवार : आपण कधीही शेतकऱ्यांचे पूर्ण विज बिल माफ करा असे म्हटले नाही. कोविड काळामध्ये ज्याप्रमाणे मध्य प्रदेशने तेथील शेतकऱ्यांचे विज बिल माफ केले. तोच पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्यात यावा असे आपण म्हटले होते. आताही शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम सुरू झाला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांची वीज बिल कट करू नये. यासाठीचे आदेश आपण काढले आहेत. शेतकऱ्याने चालू वीज बिल भरावा इतर कोणत्याही थकबाकीसाठी अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे मागणी करू नये असे स्पष्ट निर्देश सरकारने दिले असल्याचं मंत्रालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले ( Accusations on farmers electricity bills ) आहेत.

वीज बिलातून सूट दिली नव्हती : तसेच राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना या सरकारने शेतकऱ्यांना एक पैसाही वीज बिलातून सूट दिली नव्हती. शेतकऱ्यांचे कनेक्शन कापण्याचं काम महाविकास आघाडी सरकारने केले (Devendra Fadnavis counterattack ) होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वीज बिलावर उद्धव ठाकरे( Devendra Fadnavis criticize Uddhav Thackeray ) कोणत्या तोंडाने बोलतात असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. आपण जे बोलतो ते करून दाखवतो असा चिमटा ही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना काढला आहे.

देवेंद्र फडणवीस

पिक विमा कंपन्या सर्वात जास्त नफ्यात : सत्तेत नसताना पिक विमा कंपन्यांच्या विरोधात मोर्चे काढले जातात. कार्यालयाच्या काचा फोडल्या जातात. मात्र सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी कोणतीही निर्णय घेतले जात नाहीत. महाविकास आघाडी सरकार राज्यात असताना पिक विमा कंपन्यांना सर्वात जास्त फायदा झाला होता. एका वर्षी तर जवळपास साडेतीन हजार कोटी रुपये पिक विमा कंपन्यांना मिळाले होते शेतकऱ्यांना त्यावर्षी कोणती मदत दिली नव्हती. सत्तेत असताना वेगळी भूमिका घेतात सत्तेतून बाहेर पडल्यावर वेगळी भूमिका घेतात आधी उद्धव ठाकरे केवळ भाषण करत होते. ते सत्तेत नव्हते म्हणून त्यांना कोणी प्रश्न विचारत नव्हते. मात्र आता उद्धव ठाकरे हे राज्याचे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या काळात त्यांनी काय केले, असा सवाल आता जनता त्यांना विचारते, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

शिवयांचा सन्मान कोणीही कमी करू शकत नाही : राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान कोणीही कमी करू शकत नाही असं पुन्हा एकदा म्हटले आहेत. यासोबतच राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले हे आपल्याला माहीत नाही. मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या महापुरुषांनी काम केले आहे, अशा कोणत्याही महापुरुषाबद्दल अपशब्द काढले जाऊ नये असं मतही फडणवीस यांनी व्यक्त केलं.

सीमा वादावर दोन्ही राज्यांनी बोलू नये : सीमा वादावर कर्नाटकचे मुख्यमंत्री केंद्र सरकारशी बोलणी करणार आहेत. मात्र सीमावाद हा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे यावर दोन्ही राज्यांच्या सरकारने बोलू नये. महाराष्ट्र सरकार देखील या सर्व मुद्द्यावर दिल्ली सरकारशी संपर्कात असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.