ETV Bharat / state

Devendra Fadnavis : गुन्हेगारी, सेक्सटॉर्शन विरोधात नवा कायदा करणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची - सेक्सटॉर्शन विरोधात नवा कायदा

राज्यात गुन्हेगारी, महिला अत्याचार, सायबर क्राईम आणि सेक्सटॉर्शनच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे. सरकारने याला चाप लावण्यासाठी ( New law to curb crime and sextortion ) एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. सायबर क्राईम आणि सेक्सटोर्शनसाठी नवा कायदा अंमलात आणला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी विधान परिषदेत ( Legislative Council ) केली.

हिवाळी अधिवेशन
हिवाळी अधिवेशन
author img

By

Published : Dec 30, 2022, 10:41 PM IST

मुंबई : नागपूरातील हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता. राज्यात काही दिवसांपूर्वी सेक्सटॉर्शनची (Sextortion Cases) प्रकरणे समोर आली होती. यानिमित्त विधानपरिषदेत चर्चा करण्यात आली. अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर दानवेंनी जोरदार टीका केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ( DCM Devendra Fadnavis ) यावर स्पष्टीकरण दिले.

राज्यात नवीन कायदा : सेक्सटॉर्शनविरोधात राज्यात कडक कायदा आणला जाईल. सेक्सटॉर्शनचा एक नवीन प्रकार लक्षात आला आहे. मध्यंतरीच्या काळात पुण्यात एक धक्कादायक घटना घडली. सेक्सटॉर्शनमुळे दोन मुलांनी आत्महत्या केली. ज्यावेळी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आपण केली, त्यावेळी असं लक्षात आलं की, राजस्थानमधील एक गावं हेच काम करत आहे. त्या गावात पुरुष आणि महिलांनी कम्प्यूटर घेतले आहेत. तिथून लोकांची फसवणूक करायची आणि मग त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे. पैसे देता येत नाहीत म्हणून काही लोकांनी लाजेपोटी आत्महत्या केल्या. हे प्रकरण समोर आल्यानंतर आपण त्यामध्येही अटक केली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सेक्सटॉर्शनचे गुन्ह्यांचे प्रमाण वाढले : येत्या काळात सेक्सटॉर्शन संदर्भातील काही गुन्हे किंवा अशा प्रकारचे जे रॅकेट तयार करण्यात आलेत. या रॅकेटला चाप बसावा म्हणून सेक्सटॉर्शनविरोधात राज्यात कडक कायदा आणण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. त्याचप्रमाणे सायबर क्राईम रोखण्यासाठी आम्ही पाऊल उचलतो आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यातील ९५ टक्के महिलांसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये जवळची लोकं होती. तर लहान मुलांवरील लैंगिक अत्याचारांसंदर्भातील ९९ टक्के गुन्हे उघडकीस आणले. ऑपरेशन मुस्कानमुळे ३७ हजार ५११ बेपत्ता मुलांना घरी पाठवण्यात यश आलं, असंही फडणवीस म्हणाले.

राज्यातील गुन्हेगारीची स्थिती : एनसीबीआरच्या रिपोर्टनुसार गेल्या वर्षभरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सत्ता कोणाचीही असो, गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसला पाहिजे. किती गुन्हा उघड झाले, किती खुलासे करण्यात आले. अगोदर 9 टक्के होते, गृहमंत्री झाल्यानंतर 40 टक्क्यांपर्यंत गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण वाढवले आता सध्या 60 टक्क्यांवर पोहोचला आहे, असे फडणवीस म्हणाले. दोषसिद्धीचा दर वाढवायला हवा. राज्य सरकारने रेट ऑफ कन्व्हेंशन वाढवण्यासाठी भूमिका घेतली आहे. सायबर क्राईमसाठी देशात अव्वल स्वरूपाचं यंत्रणा उभारली जाईल. महिला अत्याचार निर्भया कांड झाल्यानंतर आपण देशात व्याख्या बदलली आहे. गुन्हे उघडकिस आणणण्याचा ट्रेंड ही वाढला आहे. नोव्हेंबर 2022 अखेरपर्यंत 400 गुन्हे दाखल झाले आहेत. तर
लहान मुलांच्या लैंगिक अत्याचार 98% उघडकीस आणल्या आहेत. चाईल्ड पोर्नोग्राफी काढून टाकण्यासाठी ब्लॅक फ्लॅश उपक्रम राबवला जाईल. त्याला अधिक अधिक तीव्रतेने पुढे नेणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

अंमली पदार्थांवर सरकारची कारवाई : ऑपरेशन मुस्कानच्या मदतीने तीस हजार पाचशे अकरा घराबाहेर गेलेल्या मुलांना शोधून आणण्याचे काम पोलिसांनी केले. 2015 ते 2022 पर्यंतही आकडेवारी आहे. पोलिसांनी केलेल्या कामाचे आपण अभिनंदन करायला हवे, असे आवाहन त्यानी केले. आतापर्यंत 4000 कोटींचे अमली पदार्थ पकडण्यात आले. केंद्र सरकारने राष्ट्रव्यापी मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र सरकार देखील या मोहिमेत सहभागी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

विरोधकांचे आरोप फेटाळले : निर्भया निधीतील वाहनांचा आताच्या सरकारने गैरवापर केला, असा आरोप होत आहे. मत, महाविकास आघाडी सरकारच्या ताब्यात अनेक नेत्यांना, मंत्र्यांना वाहने देण्यात आली होती. त्यापैकी 94 पोलीस ठाण्याला 151 वाहने दिल्याचे सांगत महाविकास आघाडीतील नेत्यांची नावे जाहीर करून विरोधकांचे आरोप फेटाळून लावले. तसेच मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांना न्यायालयाने उत्तर देऊन तोंडावर पाडल्याचा टोला लगावला. शाळा बंद करण्याचे षंढयंत्र असल्याचे आरोपही खोडून कढत एक मुलगा असेल तरीही शिकवण्याची जबाबदार राज्य सरकारची असल्याचा दावा केला.

प्रकल्पावरून विरोधकांवर जोरदार घणाघात : समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन यंत्रणा तैनात केले आहे. 15 रुग्णवाहिका, बारा पोलीस वाहने नेमले आहेत. अपघात विरहित हा महामार्ग ठेवण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे जुन्या गाड्या, जुने टायर असलेल्या गाड्या यावरून धावल्या तर अपघात होऊ शकतो. वाहन चालकांनी अशा गाड्या या महामार्गावर चालवू नयेत, असे आवाहन केले. परराज्यात जाणाऱ्या प्रकल्पावरून ही विरोधकांवर जोरदार घणाघात केला. मुंबईतील म्हाडाच्या घोटाळ्यांची ही चौकशी केली जाईल. कोणताही राजकीय अभिनवेश यात नसेल. तसेच जाणीवपूर्वक शोधून कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही दिली. सुरज परमारच्या केस मध्ये एसआयटी लावली तर अनेकजण उघडे पडतील. सगळ्यांची इच्छा असेल तर नक्की एसआयटी चौकशी लावली जाईल, असा सूचक इशारा फडणवीस यांनी देत, विरोधकांचे तोंड गप्प केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.