मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता पैशांच्या गैरव्यवहाराचा प्रकार उघड झाला आहे. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री आणि सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीवर आर्थिक आरोपही केले आहेत. त्यामुळे ईडीने आपल्या अखत्यारीत या प्रकरणात लक्ष घालावे व तपास करावा, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी सर्वांकडून होत आहे. राज्य सरकार महाराष्ट्र पोलिसांच्या हातून हे प्रकरण दुसऱ्या कोणत्याही तपास यंत्रणेला सोपवण्यास नकार देत आहे. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात ईडीने तपास करावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणात पैशांच्या गैरव्यवहाराचा आरोप झाल्याने हे प्रकरण अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीच्या अखत्यारीत येते. त्यामुळे याचा तपास ईडीने करावी, असे फडणवीस म्हणाले.
रियाने सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. त्याचबरोबर आर्थिक फसवणुकीचे आरोप केले आहेत. या संपूर्ण प्रकरणात ईडीकडून आर्थिक अंगाने तपास व्हावा, अशी मागणी वडिलांनी देखील केली. ईडीने सध्या बिहार पोलिसांकडून सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीतील माहिती मागवली आहे. तसेच सुशांतच्या बँक खात्याची देखील माहिती मागवली आहे.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास ईडीकडे द्यावा - देवेंद्र फडणवीस
सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात पैशांच्या गैरव्यवहाराचा आरोप झाल्याने हे प्रकरण सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीच्या अखत्यारीत येते. त्यामुळे याचा तपास ईडीने करावी, असे फडणवीस म्हणाले.