ETV Bharat / state

टीआरपी घोटाळा : कुठपर्यंत गेला मुंबई पोलिसांचा तपास - TRP Scam investigation News

टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी चौदाव्या आरोपीला अटक केली आहे. ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे माजी सीओओ रोमिल रामगरिया यास मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे.

Mumbai Police
मुंबई पोलीस
author img

By

Published : Dec 18, 2020, 11:55 AM IST

मुंबई - टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी खुलासा केल्यानंतर यासंदर्भात 14 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. बीएआरसीचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर रोमील रामगाडिया याला मुंबई पोलिसांनी चौदावा आरोपी म्हणून अटक केली आहे. त्याची चौकशी केल्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा होणार असल्याचेही मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे.

राज्याबाहेरील 70 केबल ऑपरेटरर्स देणार साक्ष -

या संदर्भात तपास करणाऱ्या विशेष पोलीस पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राबाहेरच्या केबल ऑपरेटरर्सला मुंबई पोलिसांनी स्टेटमेंट देण्यासाठी बोलावले आहे. 70 केबल ऑपरेटरर्स या घोटाळ्यासंदर्भात साक्ष देणार आहेत. तपासामध्ये ड्युएल, ट्रिपल एनसीएमच्या माध्यमातून टीआरपी वाढवता येतो का? याचा शोध घेतला जात आहे. रिपब्लिकनच्या घनश्याम सिंह याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीदरम्यान बार्क व हंसामधील काही लोक हे टीआरपी घोटाळ्यासाठी जबाबदार असल्याचे समोर आले आहे. यामुळेच बार्कचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर रोमील रामगडीया याला अटक करण्यात आली आहे. जुलै 2020 मध्ये त्याने बार्क मधून राजीनामा दिला होता.

रोमील व विकास खानचंदानीमध्ये होता संपर्क -

रोमील रामगडीया याचा मोबाईल फोन मुंबई पोलिसांनी जप्त केला आहे. देशात कुठे-कुठे बैरोमीटर लावण्यात आलेले आहेत, याची सर्व माहिती रोमिल रामगडीया याला आहे. पोलिसांच्या मते, फेक टीआरपी मिळवण्यासाठी रोमील रामगडिया आणि रिपब्लिकचा संचालक व सीईओ विकास खानचंदानी या दोघांमध्ये फोन, व्हॉट्सअ‌ॅप वर बोलणे झाले होते. गेल्या दोन वर्षापासून रोमील या संदर्भातील माहिती ठराविक माध्यमांना पुरवत असल्याचे समोर येत आहे.

आतापर्यंतचा अहवाल 'ईडी'ला सुपूर्त -

आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासाचा अहवाल मुंबई पोलिसांकडून ईडीला देण्यात आला आहे. सिरीयस फ्रॉड इन्वेस्टिगेशन डिपार्टमेंटलासुद्धा टीआरपी घोटाळ्याचा अहवाल पाठवण्यात आल्याचे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट तपासला असून त्यानुसार एक हजार पेक्षा जास्त कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला आहे.

काय आहे टीआरपी घोटाळा?

पोलिसांकडून चलचित्र वाहिन्यांच्या (टीव्ही चॅनल्स) टीआरपी घोटाळ्याचा मोठा खुलासा करण्यात आला होता. आपल्या चॅनेलचा टीआरपी जास्त यावा यासाठी काही चॅनल्स संबंधितांना पैसे देऊन दिवसभर टीव्ही सुरू ठेवत ते चॅनल लावण्यास सांगत होते. हे रॅकेट देशासह विदेशातही अस्तित्वात असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी दिली होती.

टीआरपीचे मोजमाप करणाऱ्या बीएआरसी (ब्रॉडकास्ट ऑडीयन्स रिसर्च कौन्सिल) म्हणजेच प्रसारण प्रेक्षक संशोधन परिषद या संस्थेच्या एका हंसा नावाच्या एजन्सीवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. देशभरात सुरू असलेल्या वृत्तवाहिन्या व मनोरंजन वाहिन्यांचे मापदंडाचे काम बीएआरसीकडून करण्यात येते.चलचित्र वाहिन्यांचे टीआरपी ठरवण्यासाठी देशभरात 30 हजारांहून अधिक मापदंड तर मुंबईसारख्या शहरात 2 हजारांहून अधिक मापदंड करायची जबाबदारी बीएआरसीवर आहे. मात्र, याचे कंत्राट हंसा नावाच्या एजन्सीला देण्यात आले होते. टीआरपी छेडछाडीचे रॅकेट परदेशातही अस्तित्वात असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.